‘रतन इंडिया’त स्थानिकांचे कामबंद

By admin | Published: April 5, 2016 03:03 AM2016-04-05T03:03:06+5:302016-04-05T03:03:06+5:30

‘रतन इंडिया’औष्णिक विद्युत प्रकल्पात कार्यरत २०० पेक्षा अधिक कामगारांनी व्यवस्थापना विरोधात एल्गार पुकारला

Local work in Ratan India | ‘रतन इंडिया’त स्थानिकांचे कामबंद

‘रतन इंडिया’त स्थानिकांचे कामबंद

Next

अमरावती : ‘रतन इंडिया’औष्णिक विद्युत प्रकल्पात कार्यरत २०० पेक्षा अधिक कामगारांनी व्यवस्थापना विरोधात एल्गार पुकारला आहे. सोमवार सकाळपासून कामगारांनी प्रकल्प परिसरातच बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
स्थानिक कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका न घेता अरेरावी आणि सापत्न वागणूक देणाऱ्या रतन इंडियाच्या व्यवस्थापनाविरोधात सुरू केलेले उपोषण सकारात्मक तोडगा निघाल्याशिवाय मागे घेतले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा ‘रतन इंडिया पॉवर लिमिटेड’ कामगार संघटनेने घेतला आहे. कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही व्यवस्थापन बधले नाही, आणि त्यामुळे कामगारांनी लढ्याला सुरुवात केली.
आंदोलनात अमोल इंगळे, दीपक गोफणे, श्रीकांत देशमुख, भूषण मारोडकर, पंकज शेरेकर, पंकज देशमुख, प्रमोद वानखडे, मंगेश सोळंके, गुल्हाने, राजेश बारबुद्धे, सागर मोहोड, मंगेश खेडकर, राहुल नाकाडे, विकास खोजे, राजेंद्र मनोहरे, अविनाश मोगलसर, उमेश याऊल, नितीन कथलकर, रोशन धर्माळे आदींसह रतन इंडियातील कामगारांचा समावेश आहे.

या आहेत मागण्या
४वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी, कर्मचाऱ्यांना ईफीएफचा लाभ मिळावा, स्थानिक आणि परप्रांतियांच्या वेतनातील तफावत दूर करावी, कर्मचारी ८ तासांपेक्षा अधिक काम करीत असेल तर ओव्हर टाईम द्यावा, सुधारित वेतनवाढ देऊन महागाई भत्ता तसेच कंपनीच्या नियमानुसार दिवाळी बोनस अदा करण्यात यावे. रोजंदारीवरील वाहनचालकांना कायमस्वरुपी घेण्यात यावे, कर्मचाऱ्यांना कायदेशीर गॅ्रच्युटी द्यावी, याशिवाय कंपनीने कामगारांशी गैरवर्तवणूक करू नये, कर्मचाऱ्यांना निवास, मेडिकल या सुविधा देण्यात याव्यात.

Web Title: Local work in Ratan India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.