लाॅकडाऊनने मुलेही कंटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:00+5:302021-05-17T04:12:00+5:30

येवदा : कोरोना काळात अक्षरशा आई-वडिलांसह मुलंसुद्धा कंटाळून गेले आहे. ना शाळा ना अभ्यास ना खेळणे ना मामाचे गाव ...

The lockdown also made the kids bored | लाॅकडाऊनने मुलेही कंटाळली

लाॅकडाऊनने मुलेही कंटाळली

Next

येवदा : कोरोना काळात अक्षरशा आई-वडिलांसह मुलंसुद्धा कंटाळून गेले आहे. ना शाळा ना अभ्यास ना खेळणे ना मामाचे गाव घर टीव्ही आणि मोबाईल या पलीकडे बच्चे पार्टी करिता कुठलीच करमणूकिची साधन उरली नाही . घरात एकापेक्षा जास्त बालक असल्याने त्यांच्यात ही भांडणयाचे प्रमाणही खूप वाढले आहेत .परंतु बच्चे पार्टी डोक्यातून काय कल्पना काढतील हा विचारही आपण करू शकत नाही . दिवसभर मोबाईल सोबत टाईमपास करत असल्याने त्याचे आई-वडील त्यांना रागावत असतात आणि ती मुलं आपला डाव साधण्याचा प्रयत्न करतात . लहान मुलं डोक्या मधून काय कल्पना काढतील याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही . येवदा येथील पेठ पुऱ्या मधील अल्तमज खान त्याने मोबाईल वरचे कार्टून गेम पाहण्याकरिता चक्क स्वतःला कागदाच्या डब्यामध्ये काही तास बंद करून मोबाईल सोबत खेळत बसला त्याच्या आई-वडिलांनी त्याची शोधाशोध केल्यानंतर तो काही वेळाने डब्यांमधून बाहेर निघाला त्यामुळे या कोरणा काळामध्ये लहान मुलं काय करतील याकडे आई-वडिलांचे लक्ष असणे अतिशय आवश्यक आहे.

Web Title: The lockdown also made the kids bored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.