‘मधुशाला’ लॉकडाऊन; तळीराम बेचैन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:50+5:30
सध्या दारूविक्री बंद असल्याने तळीरामांच्या मनाची घालमेल अधिकच वाढली आहे. सरकारने दारूविक्री सुरू करावी, यासाठी तळीरामांकडून समाज माध्यमांवर क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. दरम्यान, या दारूबंदीच्या काळात दारूची दुकाने फोडण्याच्याही घटना घडल्या आहेत. केरळमध्ये दारू न मिळाल्याने काही जणांनी आत्महत्या केली. यावरून तळीरामांना दारूबद्दल असलेले आकर्षण जाणवते. तूर्तास हातभट्टीच्या दारूकडे लोकांचा कल वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : लॉकडाऊनमुळे व्यथित तळीरामांची मनोदशा बिघडली आहे. प्रशासनाने दारू विक्री दुकाने बंद केली आहेत. परिणामी आपली तलफ भागविण्यासाठी या तळीरामांना ५० रुपयांची पावटी ‘ब्लॅक’मध्ये २०० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. तेवढे पैसे देऊ न शकणारे तळीराम बेचैन आहेत. तथापि, त्यांना व्यसनातून बाहेर काढण्याची ही संधीदेखील आहे.
सध्या दारूविक्री बंद असल्याने तळीरामांच्या मनाची घालमेल अधिकच वाढली आहे. सरकारने दारूविक्री सुरू करावी, यासाठी तळीरामांकडून समाज माध्यमांवर क्लृप्त्या लढविल्या जात आहेत.
दरम्यान, या दारूबंदीच्या काळात दारूची दुकाने फोडण्याच्याही घटना घडल्या आहेत. केरळमध्ये दारू न मिळाल्याने काही जणांनी आत्महत्या केली. यावरून तळीरामांना दारूबद्दल असलेले आकर्षण जाणवते. तूर्तास हातभट्टीच्या दारूकडे लोकांचा कल वाढला आहे.
दारूचे व्यसन हा एक असाध्य असा सामाजिक आजार आहे. तथापि, पिणाऱ्याच्या मनाचा निग्रह व निश्चय यांच्या बळावर हे व्यसन सुटू शकते.
कोरोना विषाणूने स्थिती गंभीर झाली आहे. मात्र, काही संधीदेखील या विषाणूने मिळवून दिली. मद्यपींकडून होणाºया त्रासाला लॉकडाऊनमुळे काही दिवस लगाम लागला. हा त्रास अर्थात मद्यपानाची सवय कायमची जावी, यासाठी कुटुंबीयांनी या कालावधीत त्यांना उद्युक्त करावे.
- हेमंत रावळे
जनरल फिजिशियन