लॉकडाऊनमध्ये ‘त्याने‘ थेट पोलीस ठाण्यात मिळविला रोजगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:55+5:302021-06-04T04:10:55+5:30

अमरावती/ संदीप मानकर सव्वा वर्षापासून कोरोनाचे सावट आहे. अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर टप्प्याटप्प्याने प्रशासनाने लागू केलेले लॉकडाऊनमुळे अनेकांचे ...

In the lockdown, he got employment directly in the police station! | लॉकडाऊनमध्ये ‘त्याने‘ थेट पोलीस ठाण्यात मिळविला रोजगार!

लॉकडाऊनमध्ये ‘त्याने‘ थेट पोलीस ठाण्यात मिळविला रोजगार!

Next

अमरावती/ संदीप मानकर

सव्वा वर्षापासून कोरोनाचे सावट आहे. अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर टप्प्याटप्प्याने प्रशासनाने लागू केलेले लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले, तर काहींना घरी राहावे लागल्याने आर्थिक अडचणी निर्माण होऊन हजारो किरकोळ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. मात्र, अशा परिस्थितीतही खचून न जाता, एका ४० वर्षीय युवकाने कडक निर्बंधातही शहर हद्दीतील थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या बुटाला पॉलीस करून रोजगार शोधला व परिवाराचा उदरनिर्वाह केला.

या हरहुन्नर व धडपड्या इसमाचे नाव आहे प्रभुदास मोहोेकार. प्रभुदास याला कोरोना कोरोनाची भीती होती. मात्र कुटुंबाचा उदरविर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांनी कडक निर्बंधातही रोजगार शोधला. उलट त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर आत्मविश्वासाने लॉकडाऊनलाच संधी समजून काम सुरू केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरील जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशव्दाराजवळ बसवून ते वकील, पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांचे व इतर नागरिकांचे बूट पॉलीसचा व्यवसाय करायचे त्यातून त्यांना प्रतिदिन ५०० ते ६०० रुपये उत्पन्न मिळायचे. पण, लॉकडाऊनमुळे काही दिवस न्यायालयाचे कामकाज बंद होते. नागरिकही रस्त्यावर फिरत नव्हते. त्यामुळे काय करायचे,असा प्रश्न त्याला पडला. त्यातही त्यांनी खचून न जाता व कामात सतत सातत्य ठेवून पायदळ पोलीस आयुक्त कार्यालय, फ्रेजरपुरा ठाणे, गाडगेनगर, सिटी कोतवाली व शहरातील इतर कार्यालयात जाऊन त्यांनी पोलीसदादांचेच बुटाला पॉलीस केले. यातून त्यांना एका ग्राहकाकडून २० ते ३० रुपये मिळत गेले. प्रतिदिन २०० ते ३०० रुपये उत्पन्न मिळवून कुटुंबाला हातभार लागल्याचे प्रभुदास यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

प्रभुदास यांना पत्नी नसून एक मुलगी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात जाऊन व्यवसाय शोधल्याने कधीही कुठल्याही पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला नाही. उलट कौतुकाने सहकार्याच्या भावनेने त्याच्या कामाचा मोबदला दिला.

बॉक्स

मुलीकरिता १४० रुपये रोज वेगळे काढतात

प्रभुदास यांना पत्नी नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांना एक मुलगी असून, ती त्यांच्या साडूच्या मुलीसोबत रूम करून राहते व शिक्षण घेते. बाप या नात्याने तिच्या शिक्षणाकरिता तिला मदत व्हावी. तिच्या राहण्याचा व खाणपानाचा खर्च भागविण्याच्या उद्देशाने प्रभुदास हे दिवसभराच्या कमाईतून तिच्याकरिता १४० रुपये प्रतिदिन वेगळे काढतात व तिला पाठवित असल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले.

Web Title: In the lockdown, he got employment directly in the police station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.