लॉकडाउनने मारले टीआरपीने तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:56+5:302021-06-19T04:09:56+5:30
अमरावती; गत वर्षभरापासून कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट आहे. या विपरीत परिस्थिती खाजगी वाहनांच्या टायर ...
अमरावती; गत वर्षभरापासून कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट आहे. या विपरीत परिस्थिती खाजगी वाहनांच्या टायर रिट्रेडिंगने (रिमोल्डिंग )प्रक्रिया एसटी महामंडळाच्या तिजोरीत मे महिन्याच्या अखेरपर्यत १ लाख ३६ हजार ८०० रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे तोट्यातील एसटी महामंडळाला काहीसा दिलासा मिळाला. कोरोना काळात वर्षभरापासून एसटी सेवा अपवाद वगळता ठप्प होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्नही थांबले आहे. या संकटात एसटी महामंडळाकडून उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.ऑगस्ट २०२० मध्ये मालवाहतूक पाठोपाठ टायर रिमोल्डिंग सेवा महामंडळाने सुरू केली या सेवेसाठी राज्यात नऊ ठिकाणी टीआरपी टायर रिमोल्डिंग प्लान्टस असून शासकीय, निम शासकीय वाहनांचा खाजगी वाहनांचे साधे तसेच ट्यूबलेस टायर रिमोल्डिंग करून देण्यात येत आहेत. या सेवेला खाजगी कंपन्यांचा इतर खाजगी शिक्षण संस्थांनी समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे . आतापर्यत ३३ टायर रिमोल्डिंग करण्यात आले त्या माध्यमातून एसटी महामंडळ १ लाख ३६ हजार ८०० रुपयांची कमाई झाली आहे.
कोट
आर्थिक संकटातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाने नवीन उत्पन्नाचे स्त्रोताचा शोध घेत एसटीचे दर कमी असल्याने मालवाहतूक की पाठोपाठ खाजगी वाहनांचे टायर रिमोल्डिंगला प्रतिसाद मिळत आहे. यामधून महामंडळाला दिड लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रक