वरूडमध्ये लॉकडाऊनच फज्जा, कायदे गुंडाळले बासनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:34+5:302021-04-16T04:12:34+5:30
फोटो - वरूड १५ एस मुख्यमंत्र्याच्या आदेशाला ‘खो’, बाजारपेठ सुरूच, अधिकारी सुस्तऑन द स्पॉट वरूड : मुख्यमंत्र्यांनी लागू केलेल्या ...
फोटो - वरूड १५ एस
मुख्यमंत्र्याच्या आदेशाला ‘खो’, बाजारपेठ सुरूच, अधिकारी सुस्तऑन द स्पॉट
वरूड : मुख्यमंत्र्यांनी लागू केलेल्या लॉकडाऊनचा वरुडात फज्जा उडाला आला आहे. गुरुवारी सकाळी रस्त्यावर गर्दी कायम होती. मात्र अधिकाऱ्यांनी कुणावरही कारवाई केली नाही. शहरात दुकाने सर्रास उघडी ठेवली होती. लॉकडाऊन-२ चा कुठेही प्रभाव दिसून आला नाही, उलट अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी परतवून लावल्याचे चित्र होते.
दररोज मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त निघत असताना, वरूड शहरात लॉकडाऊनच प्रभाव अद्याप दिसून आलेला नाही. गुरुवारी व्यापाऱ्यांनी केदार चौकात दुकाने उघडी ठेवली. त्यामुळे रस्त्त्ने खरेदीदारांची गर्दी कायम होती. नगर परिषद, पोलीस प्रशासन वा आपत्ती व्यवस्थापन समितीसुद्धा कुठेही दिसली नाही. लॉकडाऊन-२ चा कुठेही प्रभाव दिसून आला नाही, उलट अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी परतवून लावले.
---------------
अधिकारी गप्प का?
नागरिक त्रस्त असताना शहरात मात्र व्यापाऱ्यांच्या तालावर अधिकारी नाचत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी कायम आहे. दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई न करता, अधिकारी गप्प का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
---------------
बँका, शासकीय कार्यालयांतही गर्दी !
नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेश असताना बँका, शासकीय कार्यालयातही नागरिकांची गर्दी कायम आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्स, मास्कचा वापराचा फज्जा उडाला आहे.