क्रांतीदिनी सीओंच्या दालनाला ठोकले कुलूप

By admin | Published: August 10, 2016 12:02 AM2016-08-10T00:02:55+5:302016-08-10T00:02:55+5:30

नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या निवारण्यासाठी युवा सेनेच्यावतीने तालुक्यातील,...

The locked lock at the center of the revolution | क्रांतीदिनी सीओंच्या दालनाला ठोकले कुलूप

क्रांतीदिनी सीओंच्या दालनाला ठोकले कुलूप

Next

नांदगावात आंदोलन : युवा सेना आक्रमक 
नांदगाव खंडेश्वर : नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या निवारण्यासाठी युवा सेनेच्यावतीने तालुक्यातील शेकडो नागरिकांनी क्रांतीदिनी ‘जबाब दो’ चा नारा देत कार्यालयाला कुलूप ठोकले. विविध कार्यालयांत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलवर आंदोलनाचा धसका घेत ‘मराठी पाट्या’ लावण्यात आल्या. विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार झाल्याने अधिकाऱ्यांनी काही समस्या तात्काळ निकाली काढल्यात. अनेक समस्यांबाबत लेखी आश्वासन दिले.
सेनेचे प्रकाश मारोटकर यांनी नागरिकांचे प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, सेंट्रल बैंक, महावितरण कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशनसह विविध कार्यालयांवर धडक दिली.
मुख्यत्वे नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून वीज बिलांसंदर्भात भेडसावणाऱ्या समस्या तत्काळ निकाली काढण्यात आल्यात. तसेच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलवर ‘नेमप्लेट’ नसल्यामुळे नागरिकांना कुठल्या कर्मचाऱ्यांकडे कुठले कामकाज आहे हे कळत नव्हते. ती समस्यासुद्धा तात्काळ निकाली काढण्यात आली. ७२ समस्यांपैकी ४० समस्या तत्काळ निकाली काढण्यात आल्यात व इतर समस्यांसोबत अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देण्यात आले. यावेळी जर १५ दिवसांत समस्या निकाली काढल्या नाहीत तर तीव्र आंदोलनचा अल्टिमेटम देण्यात आला.
यावेळी आंदोलनात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, बाळासाहेब राणे, सुभाष मुळे, शिवानी मेश्राम सुवती तालुकाप्रमुख, मधुकर कोणळे, गजानन खोडे, वनिता काळबांडे, अमोल दांडगे, अमोल ठवस, मनचेव चव्हाण, गोपाल सगणे, प्रकाश पवार, सूरज मलोमटे, ब्राम्हानंद शामसुंदर, भावेश थोरात, भुमेश्वर गोटे, सागर सोनोने, पंकज रामगावकर, अभय बनारसे, पवन ठाकरे, चंद्रशेखर दुधमोचन, बालू शेंडे, आकाश रमणे, आकाश काकडे, अक्षय हिवराले, शाम चौधरी, मधुकर काकडे, ऋषि काकडे, सुमित चौधरी, अरुण लायबर, रुपेश मारोटकर यांचेसह शेकडो कार्यकर्ता सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The locked lock at the center of the revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.