तिकीट प्राप्ती कार्यालयाला कुलूप ठोकून नियंत्रकांचे पलायन

By admin | Published: September 9, 2015 12:16 AM2015-09-09T00:16:09+5:302015-09-09T00:16:09+5:30

स्थानिक राज्य परिवहन महामंडळाच्या वरुड आगारातील वाहतूक नियंत्रकाने आगारातील तिकीट मशिन (इलेक्ट्रॉनिक इटीआयएम) प्राप्ती करण्याच्या कार्यालयाला कुलूप ....

Locked to the office of the receipt of the ticket and the control of the controllers | तिकीट प्राप्ती कार्यालयाला कुलूप ठोकून नियंत्रकांचे पलायन

तिकीट प्राप्ती कार्यालयाला कुलूप ठोकून नियंत्रकांचे पलायन

Next

प्रवासी ताटकळत : तासभर उशिरा धावल्या बसगाड्या
वरुड : स्थानिक राज्य परिवहन महामंडळाच्या वरुड आगारातील वाहतूक नियंत्रकाने आगारातील तिकीट मशिन (इलेक्ट्रॉनिक इटीआयएम) प्राप्ती करण्याच्या कार्यालयाला कुलूप लावून पलायन केल्याने एसटीबसेस तब्बल एक तास उशिरा धावल्याचा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांना तासभर ताटकळत बसावे लागल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला होता.
मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान बाहेरगावी जाणाऱ्या एसटीबसेस नियोजित गावात जाण्यासाठी सज्ज होत्या. चालक वाहकांनी आपली गाडी बसस्थानकात उभी केली. प्रवाशांना तिकीट देणारी इलेक्ट्रॉनिक मशीन आगारातील वाहतूक नियंत्रकांकडून घेण्यासाठी वाहक गेले. तेव्हा मात्र आगार नियंत्रक व्हि.आर.श्रीवास्तव हे कार्यालयाला कुलूप लावून गेला होता. यामुळे वाहक आणि चालकांची फजिती झाली. परंंतु गाडीत जाऊन बसलेल्या प्रवाशांना सुध्दा वाट पहावी लागली. एक वाजता नंतरच्या वरुड आगाराच्या सर्व गाड्या उभ्या होत्या. तिकीट देणारी मशीन नसल्याने वाहकांना पुढे जाता आले नाही. या वादाचा वचपा काढण्यासाठी वाहतूक नियंत्रकाने चक्क कार्यालयाला कुलूप लावून पळ काढला. यावेळी वाहतूक नियंत्रकाला भ्रमणध्वनीवरुन संपर्कसाधण्याचा प्रयत्न वाहकांनी केला. परंंतु त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. आगार व्यवस्थापक वानखडे यांनी पंचनामा करुन कार्यालयातून तिकीट देणाऱ्या मशिना बाहेर काढल्या. संपूर्ण सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर दुपारच्या पाळीतील वाहकांना मशीन देण्यात आल्या. हे सोपस्कार पार पाडताना एक ते दीड तास लागला. परंतु प्रवाशांना मात्र यावेळी चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला. वाहतूक नियंत्रकाच्या मनमानी कारभारामुळ ेप्रवाशांची कामे बुडाली तर विद्यार्थ्यांचे शाळा, कॉलेजेसमध्येसुध्दा जाणे शक्य नसल्याने शैक्षणिक नुकसान सहन करावे लागले. काहींची शासकीय कामे होऊ शकली नाहीत. अनेकांना कोर्टाच्या तारखेवर हजर राहता आले ेनाही. हा प्रकार वरुड आगारामध्ये ेघडल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तर एस.टी.बससुध्दा एक ते दीड तास उशिरा धावल्याने प्रवाशांचे हाल झाल्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी. (तालुका प्रतिनीधी)

Web Title: Locked to the office of the receipt of the ticket and the control of the controllers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.