आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाला ठोकले कुलूप

By admin | Published: February 23, 2016 12:07 AM2016-02-23T00:07:28+5:302016-02-23T00:07:28+5:30

अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर आयुक्त पदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी,...

Locked to the office of tribal Additional Commissioner | आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाला ठोकले कुलूप

आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाला ठोकले कुलूप

Next

अधिकारी, कर्मचारी अडकले : आदिवासी विकास परिषदेचे आंदोलन
अमरावती : अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर आयुक्त पदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदीस्त करून कायम स्वरुपी एटीसीची मागणी रेटून धरली. या आंदोलनाने एकच खळबळ उडाली होती.
पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी तत्काळ या आंदोलनाची दखल घेऊन एटीसी कार्यालय गाठले. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. तब्बल १४ जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाला कायम स्वरुपी एटीसी मिळाले नाही. आंदोलनकर्त्यांच्या मते दोन वर्षांपासून हे पद लालफीतशाहीत अडकले असून अप्पर आयुक्त पदावर आदिवासी समाजाची जाणीव असलेल्या अनुभवी व तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदीवासी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष विलास वाघमारे यांच्या नेत्तृत्वात करण्यात आली. तत्पूर्वी आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त नितीन तायडे यांना निवेदन सोपविले. मात्र, त्यांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने आंदोलनात्मक पावित्रा घेतला. कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यालयाच्या आत बंदिस्त करून कार्यालयाला कुलूप ठोकल्याने एकच गोंधळ उडाला. एटीसी कार्यालयाला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. मात्र, आंदोलनकर्ते कुलूप लावून तेथून पसार झाले होते. उपायुक्तांच्या उपस्थितीत कार्यालयाचे कुलूप उघडल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटकेचा निश्वास सोडला. या आंदोलनाबाबत उपआयुक्त तायडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ते पोलीस तक्रार करणार होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस तक्रार दाखल केली नव्हती.

Web Title: Locked to the office of tribal Additional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.