उपायुक्तांनी ठोकले अनधिकृत गॅरेजला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:23 PM2019-02-11T23:23:56+5:302019-02-11T23:24:16+5:30

स्थानिक वालकट कंपाऊंड स्थित अग्निशमन विभागाच्या आवारात कित्येक वर्षांपासून सुरू असलेले गॅरेज अखेर महापालिकेच्या उपायुक्तांनी बंद केले. 'लोकमत'ने हा मुद्दा सोमवारी लोकदरबारात मांडला होता.

Locked on unauthorized garage made by Deputy Commissioner | उपायुक्तांनी ठोकले अनधिकृत गॅरेजला कुलूप

उपायुक्तांनी ठोकले अनधिकृत गॅरेजला कुलूप

googlenewsNext
ठळक मुद्देअग्निशमन विभागात इतर वाहनांना प्रवेश निषिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक वालकट कंपाऊंड स्थित अग्निशमन विभागाच्या आवारात कित्येक वर्षांपासून सुरू असलेले गॅरेज अखेर महापालिकेच्या उपायुक्तांनी बंद केले. 'लोकमत'ने हा मुद्दा सोमवारी लोकदरबारात मांडला होता.
साडेआठ लाख लोकसंख्येचे हे अमरावती महानगर. नागरिकांची काळजी वाहण्याचे कार्य हे प्रशासन करते. परंतु, येथील वालकट कंपाऊंड स्थित महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आवारातच कित्येक वर्षांपासून अवैधरीत्या दुचाकी, चारचाकी वाहन दुरुस्तीचे गॅरेज सुरू होते. याकडे 'लोकमत'ने प्रशासनाचे लक्ष वेधले. महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे सोमवारी १२.३० वाजता धडकले. प्रवेशास मनाई केल्यानंतरही काही वाहने आत शिरत असल्याचे पाहून नरेंद्र वानखडे यांनी प्रत्यक्ष त्या वाहनांची हवा सोडली. एवढेच नव्हे तर अग्निशमन विभागात बाहेरील वाहने ये-जा करीत असलेल्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. त्यामुळे दारापर्यंत आलेले वाहनचालक दुसरा मार्ग शोधताना दिसून आले.
आपत्कालीनऐवजी आम वाहतूक
फायर ब्रिगेडच्या आवारातील गॅरेज हटविण्याचे निर्देश यापूर्वी दिले होते. आपत्कालीन द्वार आम वाहतुकीसमान झाले होते. आतील वाहने हटविण्यास सांगितले. दरम्यान, दोन वाहनांचीसुद्धा हवा सोडली. बाहेरचे गेट सतत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे; यापुढे गॅरेज लागल्यास मी कारवाई करेन, अशी सूचना दिल्याची माहिती महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.

Web Title: Locked on unauthorized garage made by Deputy Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.