लोकसभा : मतमोजणी गुुरुवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:07 AM2019-05-18T01:07:28+5:302019-05-18T01:08:07+5:30
लोकसभा निवडणूक मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २३ मे रोजी होणारी मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. अमरावती मतदारसंघाचे लोकसभेतील प्रतिनिधी कोण राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणीदरम्यान व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजाव्या लागणार असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब लागेल, असे संकेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणूक मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २३ मे रोजी होणारी मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. अमरावती मतदारसंघाचे लोकसभेतील प्रतिनिधी कोण राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणीदरम्यान व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजाव्या लागणार असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब लागेल, असे संकेत आहेत.
अमरावती लोकसभेची निवडणूक १८ एप्रिल रोजी पार पडली, तर देशात सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी संपत आहे. २३ मे रोजी संपूर्ण अमरावतीकरिता मतमोजणी बडनेरा मार्गालगतच्या नेमाणी गोडाऊनमध्ये होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने लागणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण १८ व १९ मे रोजी घेण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांना तब्बल ३५ दिवस निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधानसभानिहाय मतमाजेणी होणार आहे. अगोदर अधिकऱ्यांच्या कक्षात चार टेबलवर टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. टपाली आणि सैनिकांच्या मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर मतदान यंत्रातील मतमोजणीस प्रारंभ केला जाणार आहे.
विधानसभानिहाय मतदार संघनिहाय रँडम पद्धतीने (सरमिसळ) लोकसभेत समाविष्ट प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रे अशा एकूण ३० मतदान केद्रांतील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या आणि मतदान यंत्रातील मते मोजली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे निकाल जाहीर करण्यास विलंब लागू शकतो, असे संकेत वर्तविले जात आहेत.
व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी ‘इन कॅमेरा’ मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाईल. चिठ्ठी उमेदवारांचे नाव अंकित केलेल्या प्लास्टिक डब्यात टाकली जाणार आहे. त्यानंतर चिठ्ठ्यांच्या एकूण आकड्याची खात्री केली जाईल.
- शरद पाटील
उपजिल्हाधिकारी, अमरावती.