Lok Sabha Election 2019; दृष्टिबाधित मतदारांना ब्रेल लिपीत बॅलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:03 PM2019-04-16T23:03:18+5:302019-04-16T23:04:19+5:30

लोकसभा मतदानासाठी दिव्यांग अन् वृद्ध मतदारांच्या मदतीला स्वयंसेवक राहतील, तर अंध मतदारांसाठी बे्रल लिपीत मतपत्रिका राहतील. १८ तारखेच्या लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी जिल्हा निवडणूक विभागाद्वारे पूर्ण झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी सांगितले.

Lok Sabha Election 2019; Ballot in Braille clip for visually impaired voters | Lok Sabha Election 2019; दृष्टिबाधित मतदारांना ब्रेल लिपीत बॅलेट

Lok Sabha Election 2019; दृष्टिबाधित मतदारांना ब्रेल लिपीत बॅलेट

Next
ठळक मुद्देलोकशाही महोत्सव : प्रशासनाची तयारी पूर्ण, मतदान प्रक्रियेची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा मतदानासाठी दिव्यांग अन् वृद्ध मतदारांच्या मदतीला स्वयंसेवक राहतील, तर अंध मतदारांसाठी बे्रल लिपीत मतपत्रिका राहतील. १८ तारखेच्या लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी जिल्हा निवडणूक विभागाद्वारे पूर्ण झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी सांगितले.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील अमरावती, बडनेरा, तिवसा, मेळघाट, अचलपूर व दर्यापूर या मतदारसंघांमध्ये एकूण १८ लाख ३० हजार ५८१ मतदार मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार आहेत. यामध्ये ६ हजार २४७ अंध अन् दिव्यांग मतदार आहे. दृष्टिबाधित मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून बे्रल लिपीतील डमी बॅलेट पेपर उपलब्ध करण्यात आले आहेत. यावरील नावांची शहानिशा करून सबंधित मतदाराला मतदान यंत्रावरील उमेदवारांच्या नावासमोरील क्रमांकानुसार मतदानाचा हक्क बजावता येईल. जिल्ह्यात असे ८०७ मतदार आहेत. यामध्ये बडनेरा ७७, अमरावती १०६, तिवसा ६०, दर्यापूर २२९, मेळघाट ७० व अचलपूर विधानसभा मतदारसंघात १२५ मतदार आहेत.
दिव्यांग मतदारांनी अधिक संख्येने निवडणुकीत सहभागी व्हावे, यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; Ballot in Braille clip for visually impaired voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.