Lok Sabha Election 2019; आमदारांशी शीतयुद्ध- नवनीत यांचा मार्ग अवरुद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:16 AM2019-03-31T01:16:46+5:302019-03-31T01:19:29+5:30

निवडणुकीचे बोधचिन्ह वा पक्षीय मतभेद अशी अनेक आव्हाने नवनीत राणा यांच्यासमक्ष उभी ठाकली असतानाच, जिल्ह्यातील आमदार मंडळींच्या मनात निर्माण झालेली अढी हा एक वेगळाच मुद्दा नवनीत यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग अवरुद्ध करणारा ठरू शकतो.

Lok Sabha Election 2019; Cold War with MLAs - Navneet's road blocked! | Lok Sabha Election 2019; आमदारांशी शीतयुद्ध- नवनीत यांचा मार्ग अवरुद्ध !

Lok Sabha Election 2019; आमदारांशी शीतयुद्ध- नवनीत यांचा मार्ग अवरुद्ध !

Next

अमरावती : निवडणुकीचे बोधचिन्ह वा पक्षीय मतभेद अशी अनेक आव्हाने नवनीत राणा यांच्यासमक्ष उभी ठाकली असतानाच, जिल्ह्यातील आमदार मंडळींच्या मनात निर्माण झालेली अढी हा एक वेगळाच मुद्दा नवनीत यांच्यासाठी लोकसभेचा मार्ग अवरुद्ध करणारा ठरू शकतो.
नवनीत यांचे मार्गदर्शक आणि पक्षनेता रवि राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा अपक्ष आमदार आहेत. राज्यात अपक्ष आमदारांचे त्यांनी नेतृत्व केले असले तरी जिल्हाभरातील आमदारांचे राणा यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. अनेकदा अनेक मुद्यांवरून इतर आमदारांमध्ये राणा यांच्याबाबत सुरू असणारी कुरबुर ऐकू येतच राहिली आहे. रवि राणा हे आमच्या कामात अडथळे निर्माण करतात, असा आरोप कमी-अधिक सर्वच आमदारांनी केलेला आहे. त्याचमुळे ही निवडणूक संधी असल्याचे हेरून हा मुद्दा आता काही आमदारांनी महत्त्वाचा केलेला आहे. रवि राणा यांना नवनीत यांच्यासाठी मदत हवी आहे. आता चावी आपल्या हाती आहे. राणा यांना आपणच वाढविले, तर आपल्यासाठी भविष्यात ते त्रासदायक ठरेल, असा भाव काही आमदारांच्या मनात आहे. आमदार रवि राणा यांनी काळाची पावले ओळखून सर्वच आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना योग्य तो मानसन्मानही दिला; तथापि चित्र परिणामकारकरीत्या पालटले असे दिसत नाही. आमदारांच्या 'आदेशा'नुसार मतदारांनी लोकसभेत मतदान केले, तर एरवी नवनीत राणा यांना मिळणारी मते इतरत्र वळण्याची शक्यता आहे. कुण्या क्षेत्रात, कुण्या आमदाराचा, किती प्रभाव आहे, हे समीकरण नवनीत यांना होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण ठरवेल.

Web Title: Lok Sabha Election 2019; Cold War with MLAs - Navneet's road blocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.