Lok Sabha Election 2019; ही निवडणूक नव्या पिढीच्या भविष्याची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:52 AM2019-04-13T00:52:23+5:302019-04-13T00:53:36+5:30
युवक, महिला आणि शिक्षितांना रोजगार नाही. दरवर्षी लाखो तरुण पदवीधर होऊनही त्यांना नोकरी नाही. त्यामुळे ही केवळ लोकसभा निवडणूक नव्हे, तर नव्या पिढीच्या भविष्याची लढाई आहे, असा ठाम विश्वास अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी येथे व्यक्त के ला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : युवक, महिला आणि शिक्षितांना रोजगार नाही. दरवर्षी लाखो तरुण पदवीधर होऊनही त्यांना नोकरी नाही. त्यामुळे ही केवळ लोकसभा निवडणूक नव्हे, तर नव्या पिढीच्या भविष्याची लढाई आहे, असा ठाम विश्वास अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी येथे व्यक्त के ला.
अमरावती-बडनेरा मार्गातील दसरा मैदानावर शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी अभिनेता गोंविदा, रिपाइं (गवई गट) राष्ट्रीय महासचिव राजेंद्र गवई, आमदार रवि राणा, नितीन मोहोड, नीळकंठ कात्रे, सुमती ढोके, चरणदास इंगोले, गणेशदास गायकवाड, अय्यूब खान, सपना ठाकूर, संतोष बद्रे, प्रवीण डांगे, पवन जाजोदिया, अजीज पटेल, भैयासाहेब मेटकर, ज्योती सैरिसे, संजय हिंगासपुरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासाचे ‘व्हिजन’ तयार आहे. युवकांच्या स्वप्नांना चालना, सामान्यांच्या श्रमाचे मोल, महिलांचे संरक्षण आणि रोजगारासाठी लोकसभेत आवाज बुलंद केला जाईल. गत नऊ वर्षांपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दौरे केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गाव, शहर, खेड्यातून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही लढाई स्थानिक विरुद्ध परके अशी होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बेलोरा विमानतळाचा विकास, नांदगावपेठ एमआयडीसीत उद्योगधंदे, रोजगारांचे प्रश्न सोडविला जाईल, असे नवनीत राणा म्हणाल्या.
गोविंदाची १४ वर्षांनंतर राजकीय स्टेजवर ‘एन्ट्री’
अभिनेता गोविंदा यांनी तब्बल १४ वर्षांनी राजकीय स्टेजवर महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांच्या प्रचार सभेत शुक्रवारी ‘एन्ट्री’ केली. ते म्हणाले, मी कोणत्याही राजकीय व्यासपीठावर जात नाही. परंतु, राणा कुुटुंबाचे गरीब, सामान्य माणसांसोबत असलेल्या नात्याने मला खेचून आणले. अस्खलित मराठीत अभिनेता गोविंदाने उपस्थितांसोबत संवाद साधला.