Lok Sabha Election 2019; निवडणूक विभाग जागला तीन दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 01:33 AM2019-04-20T01:33:07+5:302019-04-20T01:34:24+5:30
निवडणूक प्रक्रिया राबविणे हे मोठ्या जोखमीचे काम समजले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपासून रात्रंदिवस राबत आहेत. १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांत जिल्ह्याच्या निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय जागे असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवडणूक प्रक्रिया राबविणे हे मोठ्या जोखमीचे काम समजले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपासून रात्रंदिवस राबत आहेत. १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांत जिल्ह्याच्या निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय जागे असल्याचे दिसून आले.
लोकसभेच्या निवडणुकीची तयारी वर्षभरापासून सुरू असली तरी आचारसंहिता सुरू झाल्यापासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. मात्र मतदानाचे पूर्वसंध्यापासून ते इव्हीएम स्ट्रांग रूम येऊन सील करेपर्यंतचे तीन दिवस जिल्हा निवडणूक विभागासह एआरओ स्तरावर जणू परीक्षा घेणारेच ठरले आहेत. लोकशाहीच्या या महाकुभांत कुठेही गालबोट न लागता निवडणूक प्रक्रिया निर्धोक व पारदर्शीपणे पार पडली. यामागे अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाºयांचे टिमवर्क महत्त्वाचे ठरले आहे.
मतदानाचे साहित्य वाटपासून धावपळीला सुरूवात झाली. मतदानाचा दिवस यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठरला. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व मतदारसंघातून ईव्हीएम नेमाणी गोडावून येथील स्ट्राँग रुममध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू असताना जिल्हा निवडणूक विभागच तात्पुरत्या स्वरूपात येथे स्थलांतरित झाला व येथेच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. विधानसभानिहाय ईव्हीएम या ठिकाणी ट्रकद्वारे आणण्यात आलेत. या मशीनची मोजणी, किती खराब झाले ते परत आलेत काय, याची पडताळणी, सर्व मशीनची बूथनिहाय मोजणी नंतर सर्व ईव्हीएम नेमाणी गोडावून येथील स्ट्राँग रूमध्ये जमा करण्यात आल्यात. यावेळी तगडा सुरक्षा बंदोबस्त या प्रक्रियेत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदारांसह जिल्हा निवडणूक विभागाचे सर्व कर्मचाºयांचे जागरण होत आहे. मात्र, लोकशाहीच्या महोत्सवात कामाचा कुठलाही ताण येवू न देता सर्वजण तत्परतेणे काम करीत आहेत.
एक दिवस हक्काची रजा
निवडणूक प्रक्रियेत तीन दिवस दिवस-रात्र जे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर होते त्यांना शनिवारी हक्काची रजा राहणार आहे. वास्तविकता असा काही नियम नाही मात्र, असा प्रचलीतपणे सुरू आहे. त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी शनिवारी आराम करतील व पुन्हा नव्या जोशात कर्तव्यावर राहतील. मात्र या अवधीत महत्त्वाचे काम असल्यास कार्यलयातदेखील त्यांची उपस्थिती राहणार आहे.