Lok Sabha Election 2019; खासदारांच्या पीएला जेनेरिक औषधी केंद्र कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:48 PM2019-04-15T23:48:50+5:302019-04-15T23:49:28+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र स्थानिक शिवसैनिकांना, बेरोजगारांना वा अपंग-गरजूंना न देता ते स्वत:चे स्वीय सहायक सुनील भालेराव यांना (पत्नीच्या नावे) देण्यात आले. अमरावती लोकसभा क्षेत्रातील एकही स्थानिक व्यक्ती खासदारांना का दिसली नाही, असा सवाल युवा स्वाभिमानी पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र स्थानिक शिवसैनिकांना, बेरोजगारांना वा अपंग-गरजूंना न देता ते स्वत:चे स्वीय सहायक सुनील भालेराव यांना (पत्नीच्या नावे) देण्यात आले. अमरावती लोकसभा क्षेत्रातील एकही स्थानिक व्यक्ती खासदारांना का दिसली नाही, असा सवाल युवा स्वाभिमानी पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे.
मुंबईत वास्तव्य असणाºया आनंदरावांनी खासदार होण्यासाठी अमरावतीतून उमेदवारी भरायची, निवडून येण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांची मते वापरायची, त्यांना राबवून घ्यायचे आणि निवडून आल्यानंतर बुलडाण्याच्या खासगी सचिवाचे घर भरायचे; हेच का अमरावतीच्या मातीशी इमान, असा संतप्त सवाल आमदार राणा यांनी केला आहे.
अपंग, अंध व मतिमंदांसाठी शासनाकडून तीन टक्के जागा आरक्षित आहे. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील त्या आरक्षित जागेवर जनऔषधी क़ेंद्राला मान्यता मिळवून खासदारांचे खासगी सचिव सुनील भालेराव यांनी डल्ला मारला. जिल्हाधिकारी कार्यालयातील मोक्याची १२.६० चौरस मीटर जागा सुनील भालेराव यांच्या पत्नी मीनाक्षी भालेराव या प्रमुख असलेल्या आस्था मल्टिपर्पज ह्युमन राइट्स फाउंडेशन (बुलडाणा) या संस्थेला देण्यात आली. तसा करारनामा जिल्हा सेतु समिती (अमरावती) च्या सदस्य सचिवांकडून मीनाक्षी भालेराव यांच्याशी करण्यात आला आहे. ती मोक्याची जागा जुलै २०१७ पासून पुढील पाच वर्षे भालेराव यांच्या संस्थेला प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राकरिता देण्यात आली आहे. ना खासदाराचे, ना त्यांच्या स्वीय सहायकाचे अमरावतीशी नाते आहे, आपुलकी आहे. बेरोजगार, गरीब, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले किंवा विधवा यापैकी कुणालाही त्या औषधी केंद्राने जगविले असते. परंतु, जनतेला मते मागून सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या भरवशावर सर्व लाभ घरात अन् चेलेचपाट्यांना द्यायचे, ही आनंदराव अडसुळांची नीती आहे, असा प्रहार आमदार राणा यांनी केला.
२२.५० टक्के नफा दरमहा तीन लक्ष उत्पन्न
मीनाक्षी भालेराव यांना या जनऔषधी केंद्रातून २२.५० टक्के नफा व महिन्याकाठी तीन लाख रुपयांचा नफा मिळत असल्याचा आरोप आमदार रवि राणा यांनी केला. या जनऔषधी कें द्राद्वारे १० ते १५ शिवसैनिकांना रोजगार मिळू शकला असता; मात्र तसे न करता केंद्र शासनाकडून ५० हजार रुपये पगार घेणाºया बुलडाणा येथील सुनील भालेराव यांना का देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी आमदार राणा यांनी केली आहे.