Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांची संवाद अन् आशीर्वाद रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:46 PM2019-04-15T23:46:08+5:302019-04-15T23:46:56+5:30

महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी शहरातील अनेक भागांत आशीर्वाद अन् संवाद रॅली काढली. रॅलीदरम्यान त्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Lok Sabha Election 2019; Navneet Rana's dialogue and blessings rallies | Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांची संवाद अन् आशीर्वाद रॅली

Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांची संवाद अन् आशीर्वाद रॅली

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांचा प्रतिसाद : संत गाडगेबाबा, भाऊसाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी शहरातील अनेक भागांत आशीर्वाद अन् संवाद रॅली काढली. रॅलीदरम्यान त्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
नवनीत यांनी सोमवारी सकाळी येथील पंचवटी, गाडगेनगर, राधानगर, प्रेरणा कॉलनी, शिवार्पण कॉलनी, पलाश लाइन, देशमुख कॉलनी, खोंडे लाइन, प्रीतम कॉलनी, अप्पू कॉलनी, तारांगणनगर, इस्कॉन मंदिर आदी परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट) यासह मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनीत राणा यांना विविध संघटनांचा लेखी पाठिंबा
नवनीत राणा यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विश्वकर्मा लोहार समाज, बेलदार सेवा संघटन, आदिवासी युवा अधिकार संघटना, माळी समाज परिषद अमरावती जिल्हा, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन आदी संघटनांनी लेखी पाठिंबा जाहीर केला आहे.

न्यायालयात वकिलांच्या भेटी घेऊन नवनीत राणा यांचा प्रचार
अमरावती : लोकसभा निवडणूक ुरिगणातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी सोमवारी न्यायालयात वकिलांच्या भेटी घेऊन सहकार्य करण्याबाबत आवाहन त्यांना केले. त्या पुनर्निरीक्षण याचिकेच्या अनुषंगाने सोमवारी न्यायालयात हजर झाल्या. ‘एका दगडात दोन पक्षी’ त्यांनी उमेदवार म्हणून वकिलांच्या भेटी घेऊन प्रचारदेखील केला.
लोकसभा निवडणुकीतील प्रचारतोफा १६ एप्रिल रोजी थंडावणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाआघाडीच्या नवनीत राणा यांनी सोमवारी दुपारी जिल्हा न्यायालय गाठले. वकिलांच्या कक्षात जाऊन त्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. प्रत्येकाला नमस्कार करून सहकार्य करण्याबाबत विनंती केली. विशेष करून, महिला वकिलांच्या भेटी घेऊन नवनीत राणा यांनी संवाद साधला. यावेळी अ‍ॅड. दीप मिश्रा, अ‍ॅड. परवेज खान, अ‍ॅड. मधुसूदन माहुरे, अ‍ॅड. अनिल जयस्वाल, अ‍ॅड. झिया खान, अ‍ॅड. वसीम शेख, अ‍ॅड. चंद्रसेन गुळसुंदरे व अन्य काही वकील मंडळींनी परिचयातील वकिलांची भेट नवनीत राणा यांच्याशी करून दिली. त्यांच्या प्रचार दौऱ्याला वकील मंडळींचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, खा. आनंदराव अडसूळ यांचे वकील उपस्थित नसल्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ३० एप्रिल ही तारीख दिली आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Navneet Rana's dialogue and blessings rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.