Lok Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांचा मतदानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:58 AM2019-04-19T00:58:25+5:302019-04-19T00:59:35+5:30

लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये पाच हजार १७९ दिव्यांग मतदार आहेत. यावेळी आयोगाद्वारा विशेष सुविधा पुरविण्यात आल्यामुळे दिव्यांग मतदारांचा टक्का यावेळी लक्षणीय वाढला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ उमेदवार होते.

Lok Sabha Election 2019; Responding to the voting of Divyan voters | Lok Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांचा मतदानाला प्रतिसाद

Lok Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांचा मतदानाला प्रतिसाद

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : आयोगाद्वारे यावेळेस विशेष सुविधा, पीडब्ल्यूडी अ‍ॅपची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये पाच हजार १७९ दिव्यांग मतदार आहेत. यावेळी आयोगाद्वारा विशेष सुविधा पुरविण्यात आल्यामुळे दिव्यांग मतदारांचा टक्का यावेळी लक्षणीय वाढला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ उमेदवार होते. सहा विधानसभा मतदार संघात दोन हजार मतदान केंद्रे असून, १८ लाख १२ हजार २४ मतदार आहेत. यामध्ये दिव्यांग मतदारांची संख्या ५ हजार १८९ एवढी आहे. या सर्व मतदारांसाठी निवडणूक विभागाने त्यांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यत नेण्या-आणण्याची व्यवस्था केली होती. सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची व्यवस्था केली असल्याने अनेक दिव्यांग मतदारांना मोठा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, त्यांच्या मदतीसाठी ग्रामरोगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांची याकरिता चांगली मदत मिळाली. त्यामुळे दिव्यांग मतदारांचा मतदानासाठीचा कल यावेळी वाढला. ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सीईओ तथा स्वीपच्या नोडल अधिकारी मनीषा खत्री, दिव्यांग सेलचे नोडल अधिकारी तथा समाज कल्याण विभागाचे सहायक उपायुक्त सुनील वारे तसेच महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे व त्यांचे सहकारी चमूने केलेल्या प्रयत्नामुळे दिव्यांग मतदारांचा मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
विशेष म्हणजे, महापालिका क्षेत्रात आॅटोरिक्षाचालक संघटनेलाही मोफत सुविधा देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले होते. या सुविधांमुळे दिव्यांग मतदारांची टक्केवारी समाधानकारक राहणार आहे.

कुणाच्याही मदतीविना दृष्टिबाधितांचे मतदान
लोकसभा निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघात गुरुवारी भिवापूरकर अंध विद्यालयाच्या मतदान केंद्रावर दोन दृष्टिबाधितांनी कुणाच्याही मदतीविना मतदानाचा हक्क बजाविल्याचे दिव्यांग सेलचे नोडल अधिकारी तथा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील वारे यांनी दिली. अजीज परसुवाले आणि पवन उके असे या दोन दृष्टिबाधित मतदारांचे नाव आहेत. त्यांच्या कारनाम्याने सर्व जण चकित झाले.

मतदार संघनिहाय मतदारसंख्या
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात एकृण ६ हजार ३४७ दिव्यांग मतदार आहेत. यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघातील ६१० आणि मोर्शी मतदारसंघातील ४४८ असे १५८ दिव्यांग मतदार हे वर्धा लोकसभा मतदार संघात येतात. उर्वरित बडनेरा मतदारसंघात ७४९, अमरावती ५८८, तिवसा १०५०, दर्यापूर १८५१, मेळघाट ३७९, अचलपूर ५७२ अशा सहा मतदारसंघात ५१८९ दिव्यांग मतदार हे अमरावती लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; Responding to the voting of Divyan voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.