Lok Sabha Election 2019; मेळघाटातील १३४ मतदान केंद्रांंवर पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:08 PM2019-04-16T23:08:47+5:302019-04-16T23:09:16+5:30
मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संपर्कक्षेत्राबाहेर असलेल्या १३४ मतदान केंद्रांवर परतवाडा येथून मंगळवारी दुपारी ६०० मतदान कर्मचारी असलेली पथके विविध वाहनांमध्ये रवाना करण्यात आली. या सर्व वाहनांना जीपीएस प्रणालीद्वारे जोडण्यात आले. मेळघाटातील मतदान कर्मचाऱ्यांच्या पथकाला रवाना करण्यासाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल प्रामुख्याने उपस्थित होते. उर्वरित २२१ मतदान केंद्रांवर बुधवारी निवडणूक पथकांना पाठविले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संपर्कक्षेत्राबाहेर असलेल्या १३४ मतदान केंद्रांवर परतवाडा येथून मंगळवारी दुपारी ६०० मतदान कर्मचारी असलेली पथके विविध वाहनांमध्ये रवाना करण्यात आली. या सर्व वाहनांना जीपीएस प्रणालीद्वारे जोडण्यात आले. मेळघाटातील मतदान कर्मचाऱ्यांच्या पथकाला रवाना करण्यासाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल प्रामुख्याने उपस्थित होते. उर्वरित २२१ मतदान केंद्रांवर बुधवारी निवडणूक पथकांना पाठविले जाणार आहे.
मतदान कर्मचारी, सुरक्षा पथक, वनविभागाच्या वॉकी टॉकी व वायरलेस असलेल्या वाहनांचा ताफा सकाळी १० वाजतापासून मतदान केंद्रावर जाण्यासाठी रवाना करण्यात आला. येथील फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या प्रांगणातून दुपारी ४ वाजेपर्यंत ही मतदान पथके पाठविण्यात आली. मेळघाट विधानसभा मतदारसंघात ४० झोनल अधिकारी पथक ठेवण्यात आले आहेत.
पोलीस, होमगार्ड आणि वन कर्मचाऱ्यांचा मतदान पथकात समावेश आहे. मंगळवारी ५७ क्रूझर, ५४ टाटा सुमो, सात मिनीबस, परिवहन महामंडळाच्या ३० बसगाड्यांमधून या पथकांना रवाना करण्यात आले. यंदा लोकसभा निवडणुकीत अद्ययावत उपकरणांचा वापर केला जात आहे. त्याअनुषंगाने अधिकारी-कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जीपीएस आणि वायरलेसद्वारे नोंद
मेळघाट विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीकरिता परतवाडा येथून वाहने रवाना करण्यात आली. त्या प्रत्येक वाहनाला जीपीआरएस यंत्रणा लावण्यात आली. त्यामुळे वाहन कुठपर्यंत पोहोचले, कुठे थांबले आदी सर्व माहिती या प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.