Lok Sabha Election 2019; आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:05 AM2019-04-18T01:05:46+5:302019-04-18T01:07:54+5:30

लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी मतदान होणार असल्याने दोन हजार मतदान केंद्रांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पोलिंग पार्ट्या बुधवारी दुपारपर्यंत संबंधित केंद्रांवर रवाना झाल्यात. गुरूवारी सकाळी सहा वाजता ‘मॉकपोल’ घेण्यात येणार आहे.

Lok Sabha Election 2019; Voting today | Lok Sabha Election 2019; आज मतदान

Lok Sabha Election 2019; आज मतदान

Next
ठळक मुद्दे२४ उमेदवार रिंगणात : दोन हजार केंदे्र; १८, ३०,५६१ मतदार बजावणार कर्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी मतदान होणार असल्याने दोन हजार मतदान केंद्रांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पोलिंग पार्ट्या बुधवारी दुपारपर्यंत संबंधित केंद्रांवर रवाना झाल्यात. गुरूवारी सकाळी सहा वाजता ‘मॉकपोल’ घेण्यात येणार आहे. त्यानंतर सात वाजतापासून सायंकाळी सहापर्यंत मतदान होईल. दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी जाहीर केली जाईल. २४ उमेदवारांसह नोटासाठी झालेल्या या मतदानाची मोजणी २३ मे रोजी होणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला एक हजार ९२६ मतदान केंद्र होती. यामध्ये ७४ सहाय्यकारी केंद्रांची भर पडल्यानंतर एकूण दोन हजार मतदान केंद्र झालेली आहेत. यापैकी २७ केंद्रांच्या नावात बदल झाला, तर ३८ केंद्रांचे ठिकाणात बदल झालेला आहे. जिल्हा निवडणूक विभागाद्वारा मतदारसंघनिहाय मतदान साहित्य ‘एआरओ’ना वितरित करण्यात आले होते. बुधवारी सकाळी संबंधित कार्यालयाद्वारा मतदार साहित्याचे वाटप पोलिंग पार्ट्यांना करण्यात आले. मेळघाटातील १३४ दुर्गम भागांतील मतदान केंद्रांवर मंगळवारी पोलिंग पार्ट्या पोहोचल्या आहेत. मतदानाच्या टक्केवारीसाठी या केंद्रांवर रनर राहणार आहेत. अन्य ठिकाणी मोबाईल नेटवर्कची सुविधा असल्याने मतदानाची टक्केवारी जलद मिळण्यास मदत होणार आहे. मतदारसंघात ९ लाख ४३ हजार ४४४ पुरुष, ८ लाख ८७ हजार ०८० स्त्री व ३७ इतर मतदार आहेत. यामध्ये ५ हजार १७९ दिव्यांगांचा समावेश आहे. यात ६६७ दृष्टिबाधित, मूदबधिर ४३१, अस्थिव्यंग व इतर व्यंग १६३२ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांसाठी विशेष सुविधा आहेत. शहरी भागात ६१७, तर ग्रामीण भागात १३८३ व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध आहे. यावेळी प्रथमच १९ सखी मतदान केंद्र स्थापन केले आहेत. या ठिकाणी सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिलाच राहतील.
१९९ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग
एकूण मतदान केंद्राच्या १० टक्के केंद्रावर यंदा वेब कास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण राहणार आहे. हे प्रक्षेपण एआरओ, डीडीआरओ, आरओ, सीईओ मुंबई व दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात दिसणार आहे व या पाचही ठिकाणावरून यावर नियंत्रण ठेवल्या जाणार आहे. ही सुविधा यावेळी प्रथमच आहे.

पावसासाठी ताडपत्री, उन्हासाठी हिरवी नेट
जिल्ह्यात मंगळवारी सार्वत्रिक पाऊस झाला. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत बाधा निर्माण होऊ शकते. याविषयीचे वृत्त 'लोकमत'द्वारा जनदरबारात मांडण्यात आले असता जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली. मतदान साहित्यासाठी वॉटरप्रुफ कापड तसेच पावसापासून बचाव व्हावा, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी ताडपत्री लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी आयोगाच्या स्तरावर यापूर्वीच सूचना देण्यात आल्या.

१९ केंदे्र हे सखी,
आदर्श मतदान केंद्र
प्रथमच १९ सखी मतदान केंद्राची संकल्पना साकारली आहे. यामध्ये अमरावती मतदारसंघात लाठेबाई विद्यालय, शिव इंग्लिश स्कूल, सेंट थॉमस, गर्ल्स हायस्कूल, तिवसा येथील दोन जि.प. शाळा, बनोसा येथील नगरपरिषद उर्दू शाळा, अंजनगावला नगरपरिषद शाळा, धारणी येथे बॉईज स्कूल, कांडली येथील आदर्श विद्यालय, परतवाड्याला नगर परिषदेची सिंधी शाळा व जिजामाता प्राथमिक स्कूल केंद्रात महिला अधिकारी व कर्मचारी राहतील.

तीन मुख्य, ७८ सूक्ष्म आॅब्झर्व्हर
१ या निवडणुकीसाठी दिनेशकुमार हे मुख्य आॅब्झर्व्हर आहेत. निवडणूक खर्चासाठी बसंत घडीयाल व कायदा व सुव्यवस्थेसाठी कुलदिपसींग सियाल आॅब्झर्व्हर आहेत. याव्यतिरिक्त ७८ मायक्रो आॅब्झर्व्हर यांचा ‘वॉच’ राहणार आहे.
२ आब्झर्व्हर सहीत २० हजार ६२३ मनुष्यबळ लागणार आहे. यामध्ये ८९१६ पोलिंग स्टॉफ, ६२६५, इतर ४६८४ पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.
३ ८५,५२५ बॅलेट पेपर लागणार आहे. यामध्ये २१००० पोस्टल बॅलेट, २५३० सर्र्व्हिस व्होटरसाठी, २९९५ बॅलेट युनिटसाटी, ४५००० टेंडर बॅलेट पेपर, ८००० डमी बॅलेट पेपर व ६००० ब्रॉली बॅलेट पेपर लागणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Voting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.