Lok Sabha Election 2019; मतदान केंद्रांवर अवकाळीचे नियोजन काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:40 PM2019-04-16T22:40:13+5:302019-04-16T22:41:26+5:30

जिल्ह्यात वादळासह गारपिटीची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. मात्र, याच कालावधीत लोकसभेसाठी मतदान होणार असल्याने मतदारसंघातील दोन हजार केंद्रांवर पावसापासून मतदान साहित्य अन् मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया गोलगोल असल्याने मतदानाचा टक्का बाधित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Lok Sabha Election 2019; What are the recurring delays in polling booths? | Lok Sabha Election 2019; मतदान केंद्रांवर अवकाळीचे नियोजन काय?

Lok Sabha Election 2019; मतदान केंद्रांवर अवकाळीचे नियोजन काय?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘आरओं’चे उत्तर गोलगोल : मतदान साहित्य वाचविणार; मतदार मात्र वाऱ्यावर

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात वादळासह गारपिटीची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. मात्र, याच कालावधीत लोकसभेसाठी मतदान होणार असल्याने मतदारसंघातील दोन हजार केंद्रांवर पावसापासून मतदान साहित्य अन् मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया गोलगोल असल्याने मतदानाचा टक्का बाधित होण्याची भीती निर्माण झाली आहे.
येत्या १८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील दोन हजार केंद्रांवर मतदान होईल. १७ तारखेला मतदान पार्ट्या ‘एआरओ’ स्तरावरून रवाना होतील. निवडणूक विभागाचे नियोजन हे ‘एप्रिल हीट’पासून मतदारांचा बचाव करण्याचे आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचनादेखील आलेल्या आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले असले तरी पहिल्या टप्प्यातील वर्धा मतदारसंघात समाविष्ट नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मतदानाची प्रक्रिया अर्धा तास विस्कळीत झाली होती. यामधून निवडणूक विभागाने काय धडा घेतला, ही बाबदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. एकेका मतासाठी जसा उमेदवारांमध्ये संघर्ष होतो, त्याचप्रमाणे हेच एकेक मत लोकशाहीला बळकट करत असते, ही बाबदेखील तेवढीच महत्त्वाचीे आहे. जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाची शक्यता असल्याने त्या दृष्टीनेदेखील निवडणूक विभागाने मतदान साहित्य व मतदार यांची काळजी, सुरक्षा अन् सुविधा पुरविणे तेवढेच महत्वाचे आहे.
जिल्हाभरात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकशाहीच्या महोत्सवाला भरते आले आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाला मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना ‘स्वीप’ उपक्रमाचे नोडल आधिकारी नियुक्त करण्यात आले. त्यांनी गावपातळीवरील अधिनस्थ यंत्रणेचा सुयोग्य वापर करीत उल्लेखनीय कामगिरी केली. आता हे जागरूक मतदार मतदान केंद्रापर्यत गेल्यावर त्यांना उन्ह व पावसापासून किमान सुविधा मिळाव्यात, अशी माफक अपेक्षा आहे.
पावसात साहित्य वाचविण्याच्या सूचना
लोकसभा निवडणुकीतील बहुतांश मतदान केंद्रे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये आहेत आणि या शाळा व वर्गखोल्याची स्थिती ही जगजाहीरच आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान अचानक पाऊस आल्यास किंवा मतदान केंद्राच्या छपरामधूून गळती झाल्यास मतदान साहित्य तसेच सामग्री भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी परिस्थिती उद्भवल्यास प्रथम साहित्य बचावाच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नांदगाव खंडेश्वरला अर्धा तास खोळंबा
वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११ एप्रिल रोजी मतदान सुरू असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मतदानाला आलेल्या मतदारांची विशेष: महिलांची तारांबळ उडाली. अनेकांनी उन्हाच्या बचावासाठी बांधलेल्या हिरव्या नेटचा पावसापासून बचावासाठी आधार घेतला. अर्धा तास पावसामुळे मतदान प्रक्रिया रखडली होती. अशा आकस्मित संकटापासून बचाव होण्यासाठी मतदान केंद्रावर तसेच रांगेत असलेल्या मतदारांसाठी कोणत्या सुविधा आहेत, असा प्रश्न विचारल्या जात आहे.
तिवसा, धारणीत पाऊस, वीजही गूल
जिल्ह्यात सोमवारी पावसाची नोंद झाली. नुकसान झाले नाही. मात्र, मंगळवारी धारणी व तिवस्याला अर्धा तास पाऊस झाला. पावसासोबत वादळाने काही ठिकाणच्या फांद्यादेखील तुटल्या. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अशीच स्थिती जिल्ह्यात आणखी दोन दिवस राहणार आहे. या नैसर्र्गिक आपत्तीचा सामना करण्यास जिल्हा निवडणूक विभागाचा ‘मास्टर प्लॅन’ काय, अशी विचारणा केली असता, उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांनी ही बाब ‘एआरओ’वर ढकलली आहे.

१८ एप्रिलकरिता हवामान विभागाचा अलर्ट नाही. मात्र, अवकाळी पाऊस आल्यास मतदान साहित्य बचावासाठी वॉटरप्रुफ कापड सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्यात. नागरिकांनी लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
- शैलेश नवाल, जिल्हा निवडणूक अधिकारी

दोन दिवस वादळासह पावसाची शक्यता आहे. १८ तारखेला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही ठिकाणी वादळासह पाऊस होऊ शकतो. जिल्ह्याचे वातावरण सतत बदलत आहे.
- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ

Web Title: Lok Sabha Election 2019; What are the recurring delays in polling booths?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.