अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात; उत्कंठा शिगेला
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 4, 2024 08:31 AM2024-06-04T08:31:46+5:302024-06-04T08:36:14+5:30
Amaravati Lok Sabha Election Result 2024 : 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली.
अमरावती : 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली. त्यापूर्वी सकाळी सहा वाजता मतमोजणी कर्मचाऱ्यांचे रँडमायझेशन करण्यात आले. त्यानंतर ७.५५ मिनिटांनी सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी गोपनीयतेची शपथ दिली. प्रथम ईटीपीएस व पोस्टल बॅलेट दहा टेबलवर आणण्यात आले आहेत.
आता प्रत्यक्ष टेबलवर मतमोजणीला सुरुवात होत आहे. केंद्रामध्ये आयोगाचे दोन ऑब्झर्वर अंजना पंडा व रजनी कांथन उपस्थित आहेत. परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. विद्यापीठ मार्गावरील सर्व रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आले आहेत. लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजी उच्चांकी ६३.६७ टक्के मतदान झालेले आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचे १३ व अपक्ष १४ असे ३७ उमेदवार रिंगणात आहे. दुपारी २ पर्यत जनतेचा कौल समोर येणार आहे.