लोकसभा निवडणूक 2024: ३७ उमेदवार रिंगणात, तीन मशीन लागणार; निवडणुकीचे चित्र स्पष्ट

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 8, 2024 04:09 PM2024-04-08T16:09:13+5:302024-04-08T16:09:36+5:30

१९ उमेदवारांची माघार, ३ अर्ज यापूर्वीच बाद

Lok Sabha Elections 2024 37 candidates in the fray, three machines needed Election picture clear | लोकसभा निवडणूक 2024: ३७ उमेदवार रिंगणात, तीन मशीन लागणार; निवडणुकीचे चित्र स्पष्ट

लोकसभा निवडणूक 2024: ३७ उमेदवार रिंगणात, तीन मशीन लागणार; निवडणुकीचे चित्र स्पष्ट

अमरावती: लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार या अखेरच्या दिवसापर्यंत १९ उमेदवारांनी माघार घेतली व त्यापूर्वी छाननीत ३ अर्ज बाद झाल्याने ३७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे तीन इव्हीएम (बीयू) लागणार आहेत. जिल्ह्यात दोन मशीनची तयारी असल्याने आयोगाकडे याची त्वरीत मागणी नोंदविण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी २८ मार्चपासून उमेदवारी अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली होती. मुदतीत म्हणजेच ४ एप्रिलपर्यंत ५९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ३ अर्ज ५ एप्रिलला छाननीत बाद झाले. त्यानंतर ६ ला दोन व अंतिम दिनी म्हणजेच ८ एप्रिलला १७ असे एकूण १९ अर्जांची माघार घेण्यात आल्याने लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात ३७ उमेदवार कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Web Title: Lok Sabha Elections 2024 37 candidates in the fray, three machines needed Election picture clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.