लोकमत कॅम्पस क्लबतर्फे आज रंगणार पहिलावहिला जादूगार शो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:11 AM2024-08-30T11:11:01+5:302024-08-30T11:11:46+5:30

Amravati : जादूगार अमित सोलंकी यांचा खास शो

Lokmat Campus Club will perform the first old magician show today | लोकमत कॅम्पस क्लबतर्फे आज रंगणार पहिलावहिला जादूगार शो

Lokmat Campus Club will perform the first old magician show today

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
लोकमत कॅम्पस क्लब दरवर्षीप्रमाणे यंदाही सदस्य नोंदणीसोबत घेऊन येत आहे पहिलावहिला जादूगार शो. ३० ऑगस्ट रोजी आयोजित शोमध्ये जादूगार अमित सोलंकी हे बालगोपाळांपुढे जादूच्या करामती सादर करतील. मनोरंजन, हास्य- विनोदाने परिपूर्ण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आजच आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


जादूगार अमित सोलंकी यांचा शो मोर्शी मार्गातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस जादूचा नजराणा चिमुकल्यांना मिळणार आहे. 


यामध्ये प्रवेश फक्त कॅम्पस क्लब सदस्य झालेल्या मुलांनाच देण्यात येईल. कार्यक्रमाला येताना वर्ष २०२४-२५ लोकमत कॅम्पस क्लबचे आयडी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. कार्यक्रमस्थळी लोकमत कॅम्पस क्लबची सदस्य नोंदणी सुरू आहे. कॅम्पस क्लब सदस्यांच्या नोंदणीसाठी ३०० रुपये फी आकारण्यात येत आहे. ती भरल्यानंतर २०२४-२५ या एका वर्ष कालावधीचे नवीन ओळखपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यक्रमाला हे ओळखपत्र आवश्यक राहील. तेव्हा आजच आपली सभासद नोंदणी करून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 


कार्यक्रमस्थळी नोंदणी सुरु 
नोदणी करताच ६४९१ रुपये किमतीची स्टेनलेस स्टील टिफीन व बॉटल कॉम्बो अगदी मोफत मिळणार आहे. यासोबत फॉर्म्यूला बुक व डिस्काऊंट कूपन मिळेल.


वेळ दुपारी ४ ते ६ 
हॅपी किड्स, सेंट फ्रान्सिस, मोहनलाल सामरा, शिवाजी आयडियल, होली पिस, पी. आर. पोटे, पोदार (बडनेरा), शांतिनिकेतन, गोल्डन किड्स या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा शो राहील.


वेळ सायंकाळी ६ ते ८ 
अरुणोदय स्कूल, बिरला ओपन माइंड इंटर नॅशनल स्कूल, होलीक्रॉस इंग्लिश, होलीक्रॉस प्रायमरी, इंडो पब्लिक, के. के. केम्ब्रिज, विश्वभारती पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा शो राहील.


वेळ सायंकाळी ८ ते १० 
नारायणा विद्यालयम, पोदार इंटर नॅशनल स्कूल (कठोरा), स्कूल ऑफ स्कॉलर्स तसेच इतर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा शो राहील.

Web Title: Lokmat Campus Club will perform the first old magician show today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.