‘लोकमत’ने दिलेल्या संधीचे सोने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:08 PM2017-09-09T23:08:50+5:302017-09-09T23:09:06+5:30

स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘लोकमत’च्यावतीने परीक्षाभिमुख लेखमाला सुरू झाली असून....

The 'Lokmat' has the opportunity to make gold | ‘लोकमत’ने दिलेल्या संधीचे सोने करा

‘लोकमत’ने दिलेल्या संधीचे सोने करा

Next
ठळक मुद्देतहसीलदार राम लंके : तिवसा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा: स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘लोकमत’च्यावतीने परीक्षाभिमुख लेखमाला सुरू झाली असून याचा प्रचार, प्रसार झपाट्याने होत आहे. लोकमतने लेखमालेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे, ही संधी गमावू नका असे आवाहन तिवस्याचे तहसीलदार राम लंके यांनी केले
तिवसा येथील यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात लोकमत व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्यावतीने शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य मनोज जगताप होते तर प्रमुख वक्ता म्हणून तहसीलदार राम लंके व सह्यायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.अनिल वाघमारे, प्रा.सी.जी.सोळंके, कार्यक्रम अधिकारी जयराम गायकवाड, संगीता भुयार आदी उपस्थित होते. लोकमतच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या या लेखमालेचे विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. यावेळी ४००च्या वर विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. तिवसा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांची संघर्षमय कहाणी सांगून लोकमतच्या लेखमालेच्या आधारे एमपीएससी, यूपीएससीचा मार्ग सुकर करण्याचे आवाहन केले. प्राचार्य मनोज जगताप यांनी लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रस्ताविक जयराम गायकवाड, संचालन मोनिका नंदरधने तर आभार सूरज दाहाट यांनी मानले.

Web Title: The 'Lokmat' has the opportunity to make gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.