मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी ‘लोकमत’चा पुढाकार

By admin | Published: June 11, 2016 12:04 AM2016-06-11T00:04:46+5:302016-06-11T00:04:46+5:30

बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्यांना आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश देऊन करिअर घडवायचे, ही चिंता सतावत आहे.

'Lokmat' initiative to create the future of children | मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी ‘लोकमत’चा पुढाकार

मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी ‘लोकमत’चा पुढाकार

Next

श्रीकांत देशपांडे : ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा थाटात शुभारंभ
अमरावती : बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्यांना आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश देऊन करिअर घडवायचे, ही चिंता सतावत आहे. मात्र, ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित शैक्षणिक प्रदर्शनात मुलांचे नक्कीच भवितव्य घडेल, असे प्रतिपादन अमरावती विभागाचे शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात लोकमत व सिपना कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’च्या शुभारंभाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुलख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख, सिपना कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य सिद्धार्थ लढके, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सहप्रबधंक दिनेश सरावगी, प्रगती ब्रेन पावर इफ्रव्हमेंटचे डायरेक्टर अखिलेश बैतुले, के.जी.एस एज्युकेशन इंन्सिट्यूटचे प्रतीक अकर्ते, ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गणेश देशमुख उपस्थित होते. प्रदर्शनीचे उद्घाटन श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांचे दीपप्रज्ज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.
आ. देशपांडे म्हणाले, 'लोकमत'चा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे. एकाच ठिकाणी राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पाल्यांना मुलांचे भवितव्य घडवायचे असेल तर नक्कीच शैक्षणिक प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी मार्गदर्शनातून केले.
कुलसचिव अजय देशमुख यांनी 'लोकमत'च्या या उपक्रमाची भरभरून प्रशंसा केली. मी येथे पालक म्हणून आलो आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर होताच दरवर्षी माता-पित्यांची प्रवेशासाठी टिकटिक सुरू होते. करिअर कोणत्या क्षेत्रात घडवायचे ही चिंता सतावत असताना 'लोकमत'ने शैक्षणिक प्रदर्शनीच्या माध्यमातून दालन उपलब्ध करून दिल्याचे अजय देशमुख म्हणाले. 'लोकमत'ने विद्यार्थ्यांसाठी सोल्युशन काढले असून ही समाज घडविण्याची तळमळ आहे. आज स्पर्धेच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचे, हे कन्फ्युजन दूर करून 'लोकमत'ने सोल्युशन काढले आहे. 'लोकमत'ने जगण्यासाठीच्या वाटा दाखविल्या असून या उपक्रमाला सलाम करूया. शैक्षणिक प्रदर्शनीला पाल्यांनी पालकांसह अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही अजय देशमुख यांनी केले. संचालन लोकमतचे वितरण प्रबंधक रवि खांडे यांनी केले.

Web Title: 'Lokmat' initiative to create the future of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.