शिक्षक महासंघाचा संसदेवर लाँगमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:25 AM2018-11-26T01:25:36+5:302018-11-26T01:26:24+5:30

जुन्या पेन्शन योजनेसाठी जंतर मंतर ते संसद भवन दिल्लीपर्यंत असलेल्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्या शेकडो शिक्षकांनी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

Longmarch on the Parliament of the Federation Confederation | शिक्षक महासंघाचा संसदेवर लाँगमार्च

शिक्षक महासंघाचा संसदेवर लाँगमार्च

Next
ठळक मुद्देदिल्लीकडे रवाना : घोषणांनी रेल्वे स्थानक दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुन्या पेन्शन योजनेसाठी जंतर मंतर ते संसद भवन दिल्लीपर्यंत असलेल्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्या शेकडो शिक्षकांनी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. नागपूर येथून अमृतसर एक्सप्रेसने दिल्लीकरिता रवाना झाले आहेत.
यावेळी अमृतसर एक्सप्रेसमध्ये चढतानाच पदाधिकारी यांनी शासन धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, मार्गदर्शक नितीन टाले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष निलेश तायडे, अकोला जिल्हा समन्वयक गजानन चौधरी, वाशिम जिल्हाध्यक्ष संदीप देशमख, बुलडाणा जिल्हाध्यक्ष दिलीप दांदडे, एस. एल.राठोड, अविनाश पाटिल, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष निलेश कानडे, राम देशमुख आदींनी शनिवारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
हा महामोर्चा जंतर-मंतर वरुन सकाळी ९ वाजता निघून संसद भवन, दिल्ली येथे जाणार आहे व कर्मचा-यांच्या मागणीसाठी संसदेला घेराव घालणार आहे.
भारतीय राज्यघटनेमध्येच सर्वांसाठी जुनी पेन्शन योजना लागू रहावी, असा उल्लेख असताना सुद्धा १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांसाठी नविन अंशदायी पेन्शन योजना लागू केली.ही भारतीय राज्यघटनेतील नियमांची पायमल्ली आहे. नवीन अंशदायी पेन्शन योजनेमुळे शिक्षक व इतर सर्व कर्मचा-यांचे भविष्यकालीन जिवन अंध:कारमय झाले आहे. त्यांचा भविष्याचा आधार शासनाने हिसकावून घेतला आहे. याचा सरकारला जाब विचारण्यासाठीच जंतर मंतर ते संसद भवन दिल्ली पर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार आहे.
सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हा शिक्षक महासंघाचा निर्धार आहे. त्यासाठी शिक्षक महासंघ जुनी पेंशन हक्क संघटनेच्या खांद्याला खांदा लावुन लढणार आहे, असे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी पदाधिकारी यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केले.

Web Title: Longmarch on the Parliament of the Federation Confederation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.