‘आयकर’ची ‘स्टॉक’वर नजर

By admin | Published: October 31, 2015 01:00 AM2015-10-31T01:00:53+5:302015-10-31T01:00:53+5:30

दिवाळीचा मोठा सण ‘कॅश’ करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आयकर विभागाची नजर चुकवून मोठ्या प्रमाणात ‘स्टॉक’ गोळा केला आहे.

Look at the 'stock' of income tax | ‘आयकर’ची ‘स्टॉक’वर नजर

‘आयकर’ची ‘स्टॉक’वर नजर

Next

धाडसत्रासाठी पथक तयार : दीपोत्सवाच्या पार्श्वभूमिवर होणार कारवाई
अमरावती : दिवाळीचा मोठा सण ‘कॅश’ करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आयकर विभागाची नजर चुकवून मोठ्या प्रमाणात ‘स्टॉक’ गोळा केला आहे. यावर आता आयकर विभागाची करडी नजर राहणार धाडसत्र राबवून कारवाई करण्याकरिता पथक गठित करण्यात आले. दिवाळीपूर्वीच व्यापाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्याची जय्यत तयारी आयकर विभागाने केल्याची विश्वसनीय माहिती आहे.
विदर्भात अमरावतीत कापडाची मोठी बाजारपेठ आहे. तयार कापड, साखर, धान्य, कापूस आदी जीवनावश्यक साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. कापड व्यवसायातून दरदिवसाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना कर चुकविणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. महापालिकेच्या सीमेबाहेर साकारण्यात आलेल्या नागपूर महामार्गावरील ‘बिझीलँड’ व्यापारी संकुलात यापूर्वी आयकर विभागाने धाडसत्र राबवून मोठी कारवाई केली होती. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमिवर मालाचा ‘स्टॉक’ असलेली स्थळे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाकडे रिटर्न्स न भरणाऱ्या प्रतिष्ठानांची यादी तयार केली आहे. व्यापाऱ्यांनी आयकर अदा केल्यानंतर त्यात काही संशयास्पद आढळते काय? हे तपासण्याचे काम युध्दस्तरावर सुरु असल्याची माहिती आहे. माल ‘स्टॉक’ करताना त्याचे विवरण आयकर विभागाकडे दिले जात नाही. आयकरच्या दृष्टीने ही शुध्द चोरी असली तरी ‘स्टॉक’ ताब्यात घेतल्यानंतर दर वाढवून ही कारवाई केली जाते. सण, उत्सवाच्या काळात व्यापारी मालाचा ‘स्टॉक’ दाखवित नाही. ही कर चुकवेगिरी ठरते. आता आयकर विभागाने माल साठवून ठेवण्याचे गोदाम लक्ष्य केले आहे. पुढील आठवड्यात दुकाने, प्रतिष्ठानांवर धाडसत्र राबवून ‘स्टॉक’ तपासला जाईल, अशी माहिती आहे. त्यासाठी कर निरीक्षकांची चमू गठित करण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या दुकानांचे ‘स्टॉक’ तपासणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Web Title: Look at the 'stock' of income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.