जलयुक्त शिवारकडे लक्ष, कोल्हापुरी बंधाऱ्याकडे दुर्लक्ष
By Admin | Published: December 31, 2015 12:14 AM2015-12-31T00:14:19+5:302015-12-31T00:14:19+5:30
अनियमित पावसामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने संरक्षित पाण्यावर शेतीचे नुकसान होत असल्याने संरक्षित पाण्यावर जोर देत नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत.
पैसा गेला पाण्यात : जिल्ह्यात बंधाऱ्यांचे दोन हजार दरवाजे गायब
अमरावती : अनियमित पावसामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने संरक्षित पाण्यावर शेतीचे नुकसान होत असल्याने संरक्षित पाण्यावर जोर देत नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत. परंतु जून्या योजनांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रूपयाचा खर्च वाया जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
मागील काही वर्षापूर्वी कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या योजनेच्या परिणामकारतेमुळे मोठाय प्रमाणात बंधारे बांधले गेले.कालांतराने त्याकडे दुर्लक्ष झाले. परंतु दरवाजेच राहीले नसल्याने पाणी वाहून गेल्यामुळे योजनेवर खर्च करण्यात आलेले लाखो रूपये वाया गेले . जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे योजना राबविण्यास सुरूवात झाल्यापासून आतापर्यत १३३ बंधारे बांधण्यात आले आहेत. तर स्थानिक स्तर सिंचन विभागाकडून १४ बंधारे जिल्हा परिषद सिंचन विभागाला हस्तांतरीत करण्यात आले आहेत.या बंधाऱ्यांना हजारो दरवाजे बसवले होते.याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे गायब होऊन पाणी वाहून जात आहे.याबाबत जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.