पांढऱ्या सोन्याची लूट; व्यापाऱ्याचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:10 PM2017-11-30T23:10:54+5:302017-11-30T23:11:17+5:30

यंदाच्या हंगामात बीटीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची बोंडे किडली. त्यामुळे पावसाची प्रतवारी खराब झाली. याचा फायदा व्यापाऱ्यांद्वारा घेण्यात येऊन बेभाव खरेदी करण्यात येत आहे. ते कापूस बोनसच्या लाभासाठी गुरातमध्ये पाठविला जात आहे.

Loot of white gold; Merchant Fund | पांढऱ्या सोन्याची लूट; व्यापाऱ्याचा फंडा

पांढऱ्या सोन्याची लूट; व्यापाऱ्याचा फंडा

Next
ठळक मुद्देबेभाव खरेदी; गुजरातमध्ये विक्री : प्रतवारी खराब दर्शवून उठविला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या हंगामात बीटीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची बोंडे किडली. त्यामुळे पावसाची प्रतवारी खराब झाली. याचा फायदा व्यापाऱ्यांद्वारा घेण्यात येऊन बेभाव खरेदी करण्यात येत आहे. ते कापूस बोनसच्या लाभासाठी गुरातमध्ये पाठविला जात आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊन ‘लाल्या’ची विकृती आली आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बोंडन्बोंड किडली. त्यामुळे कापसाची प्रतवारी खराब झाली. परतीच्या पावसानेदेखील कापूस झाडावर ओला झाल्याने प्रतवारी खराब झाल्यामुळे पणनसह सीसीआयच्या केंद्रांवरदेखील या कापसाला नाकारण्यात येते. खासगी व्यापाºयांकडे या कापसाची दुय्यम दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यंदा बीटीच्या बीजी-२ वाणाला बोंड अळीने ग्रासल्यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होऊन धाग्याच्या लांबीवर परिणाम होत आहे. तसेच बोंडातील सरकी अळीने खाल्ल्यामुळे कापसाचे वजनदेखील कमी होत आहे. अळीच्या विष्टेमुळे कापसाच्या रंगावरही परिणाम होत आहे. आदी घटकांमुळे कापसाची गुणवत्ता खराब झालेली आहे. त्याचा थेट परिणाम कापसाच्या दरावर झालेला आहे. मात्र त्याचवेळी व्यापारी शेतकºयांकडून खरेदी केलेला कापूस बोनससाठी गुुजरात राज्यात विकला जात आहे.
गुजरातमध्ये हमीभाव व ५०० रुपये बोनस
जिल्ह्यातील कापसाची गुणवत्ता खराब झाली असली तरी व्यापाऱ्यांद्वारा दुय्यम दर्जाचे दराने कापसाची खरेदी करून गुजरातमध्ये पाठविला जात आहे. गुजरातमध्ये चार हजार ३१० रूपये हमीभाव व प्रतिक्विंटल ५०० रूपये बोनस दिला जात असल्याने व्यापाºयांना चार हजार ८०० रूपये भाव मिळत आहे. तेथील सरकार कमी प्रतवारीचा कापूस हमीभावाने खरेदी करून बोनसही देत आहे.
शासनाची एक हजार, व्यापाऱ्यांची ५३ हजार क्विंटल खरेदी
सध्या पणन महासंघाद्वारा हमीभावाने २९ क्विंटल, सीसीआयची १२९५ क्विंटल तर व्यापाऱ्यांद्वारा ५२ हजार ४०९ क्विंटल खरेदी करण्यात आली. शासनाचूी धामणगाव व अंजनगाव सुर्जी येथेच तर व्यापाºयांची सर्वच तालुक्यात खरेदी केलेली आहे. सरासरी ४३०० ते ४५०० रूपये प्रति क्विंटल दराने ही खरेदी करण्यात आली. तर बुधवारी ५,०१८ क्विंटल खरेदी करण्यात आली.

Web Title: Loot of white gold; Merchant Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस