लोपामुद्रा महोत्सवाची आजपासून सुरुवात; 10 दिवस नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 04:42 PM2020-02-16T16:42:42+5:302020-02-16T16:42:56+5:30
परराज्यातील चमुंचे सादरीकरण
अमरावती: केंद्र सरकारचे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र संस्कृती मंत्रालय, उदयपूर (राजस्थान), अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय व ‘कॅन्व्हास फाउंडेशन-द शेड ऑफ आर्ट, चॅरिटेबल ट्रस्ट’ यांचे संयुक्त विद्यमाने ‘लोकतरंग-लोपामुद्रा’ राष्ट्रीय पारंपरिक लोकनृत्य व हस्तशिल्पकला महोत्सव १७ ते २६ फेब्रुवारी दरम्यान अमरावती येथील सायंसकोर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात, ओरिसाहून संबलपुरी, आसामचे जगप्रसिद्ध बारडोई शिकला, ढाल डुंगरी, बिहू नृत्य, पश्चिम बंगालचे पुरलिया छाड, हरियाणाचे घुमर, महाराष्ट्रातील लावणी, कोळीनृत्य, सोंगी मुखवटे, राजस्थानचे घेर नृत्यलोक, संगीत कठपुतली, कालबेलिया व बहुरूपी, गुजरातचा सिद्दी धमाल, राठवा तृत्य व बहुरूपी, मध्यप्रदेशचे प्रसिद्ध बधाई नृत्य, नोरता नृत्य, उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध मयुर व चारकुला नृत्य, आंध्रप्रदेशचे माधुरी नृत्य, छत्तीसगडचे पंडवानी गायन आदी पारंपरिक लोकनृत्य-संगीत यावर्षीचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
१७ ते २६ फेबु्रवारी या १० दिवसांत होणाºया ‘लोकतरंग-लोपामुद्रा’ महोत्सवात विविध राज्यांतील ३०० पेक्षा अधिक पारंपरिक लोकनृत्यात कलाकार भाग घेणार आहेत. देशभारातील हस्तशिल्पकला प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. या महोत्सवात प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रीती आशिष शेरेकर यांनी केले आहे.