आंबियाची फळगळ कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 10:26 PM2019-08-04T22:26:34+5:302019-08-04T22:27:02+5:30

जिल्ह्यात सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ओरड झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. ही तिसºया अवस्थेतील फळगळ किंवा पूर्ण वाढ झालेल्या व अपरिपक्व फळांची गळती असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे विदर्भाचा कॅलीफोर्निया अशी ओळख असलेल्या राज्याचे कृषिमंत्र्यांच्या मोर्शी मतदारसंघासह अन्य चार तालुक्यांतील संत्राउत्पादक संकटात सापडला आहे.

Loss of billions of fruits of mango | आंबियाची फळगळ कोट्यवधींचे नुकसान

आंबियाची फळगळ कोट्यवधींचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागाला उशिरा जाग : कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात संत्रा उत्पादक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ओरड झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. ही तिसºया अवस्थेतील फळगळ किंवा पूर्ण वाढ झालेल्या व अपरिपक्व फळांची गळती असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे विदर्भाचा कॅलीफोर्निया अशी ओळख असलेल्या राज्याचे कृषिमंत्र्यांच्या मोर्शी मतदारसंघासह अन्य चार तालुक्यांतील संत्राउत्पादक संकटात सापडला आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई असताना संत्राउत्पादकांनी टँकरने पाणी आणून बागा जगविल्या. यामध्ये ज्या बागा वाचल्या त्यांच्या आंबिया बहराची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ही फळगळ नत्राच्या कमतरतेमुळेही होत असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. फळांच्या वाढीसाठी नत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नत्रामुळे पेशीक्षयाची क्रिया मंदावते तसेच आॅक्सिझन या संजीवकाच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. पानातील एकूण नत्रापैकी अमोनिया अमोनिअम या संयुगाची मात्रा फळांच्या सशक्त वाढीसाठी आवश्यक आहे. या संयुगाची मात्रा कृत्रिमरीत्या युरियाची फवारणीद्वारे वाढविता येते. कर्बोदकांच्या अभावामुळे पाने, फुले व फळे यांच्यात पेशीक्षय होतो. पावसाळयात होणाºया सततच्या पावसाच्या पाण्याने जमिनीतील मुळे कुजतात व मुळांना प्राणवायूचा कमी प्रमाणात पुरवठा होतो. बोट्रिओडिप्लोडिआ, कलेटोट्रिकम व काहिअंशी आॅल्टरनेरिआ या बुरशीमुळे फळांची गळती होते. या बुरशी फळांच्या देठांमधून फळांमध्ये प्रवेश करतात व पूर्ण वाढ झालेल्या फळांचे नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर रोग जास्त पसरतो. तसेच काळी माशी, मावा-तुडतुडे यांच्या शरीरातील निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशी वाढून पेशीक्षय होऊन फळगळ होते. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे आवश्यक आहे. साधारणपणे एका फळाची पूर्ण वाढ होण्यास जवळपास ४० पाने असावी लागतात, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी दिली.
अचलपूर तहसीलदारांना निवेदन
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अज्ञात रोगाने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक मोठ्या प्रमाणात संत्रा फळांची गळती होत असल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. प्रतिहेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी दीपक सुरेश पाटील, राहुल नंदकुमार तट्टे, सुधीर सुदाम चरोडे, शांताबाई सुधाकर चरोडे, रवींद्र पुंडलिकराव निकम, अनिल चरोडेसह परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
असे करावे व्यवस्थापन
कृत्रिम जैवसंजीवक नॅफथॅलीन (एन.ए.ए.) वनस्पतीतील अंतर्गत आॅक्सिझन वाढवून पेशीक्षय मंद करण्याचे कार्य करतात. बुरशीजन्य रोगांमुळे होणारी फळगळ कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाच्या फवारण्यामुळे रोखू शकतो. नत्राची कमतरता युरियाच्या फवारणीमुळे दूर करू शकतो. फळगळ रोखण्यासाठी तातडीने एन.ए.ए. किंवा २४-डी १५ पीपीएम १.५ ग्रॅम अधिक युरिया १ किलो अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम १०० लिटर पाण्यात फवारणी करावी. फळगळ निंयत्रणात न आल्यास आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात ही फवारणी करावी.
अशी घ्यावी काळजी
झाडावर भरपूर पालवी राहावी यासाठी अन्नद्रव्यांचा शिफारसानुसार वापर करावा. फळांच्या तोडणीनंतर लगेच वाळलेल्या फांद्या छाटून टाकावी. पावसाळ्यात बगिच्यात पाणी साचू देऊ नये. बगिच्यातील जास्तीचे पाणी उताराच्या दिशेने व प्रत्येकी दोन ओळीनंतर ३० सेमी खोल, ३० सेमीखालची रुंदी व ४५ सेमी वरची रुंदी असलेले चर खोदावेत. गळलेली फळे तातडीने उचलून दूर फेकावीत. नॅफथॅलीन सेटिन सिड एनएए किंवा २४-डी पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्यामुळे ४०-५० मिली अल्कोहोल किंवा सिटोनमध्ये विरघळून घ्यावीत.

Web Title: Loss of billions of fruits of mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.