११ दुकानांची राखरांगोळी कोट्यवधींची हानी

By Admin | Published: February 17, 2016 12:01 AM2016-02-17T00:01:28+5:302016-02-17T00:01:28+5:30

शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तंभ चौकावरील लाकुड बाजाराला मंगळवारी पहाटे ३.३० वाजता लागलेल्या आगीत अकरा दुकानांची राखरांगोळी झाली.

Loss of Rakharangoli crores of 11 shops | ११ दुकानांची राखरांगोळी कोट्यवधींची हानी

११ दुकानांची राखरांगोळी कोट्यवधींची हानी

googlenewsNext

कारण अज्ञात : लाकूड बाजारात अग्नितांडव
परतवाडा : शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तंभ चौकावरील लाकुड बाजाराला मंगळवारी पहाटे ३.३० वाजता लागलेल्या आगीत अकरा दुकानांची राखरांगोळी झाली. यामध्ये एक कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक काच घर व अॉटोरिक्षा पार्ट वगळता सर्व फर्निचरची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अचलपूर व इतर नगरपालिकांच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. परिणामी लाकूड बाजारातील उर्वरित दुकाने बचावली.
परतवाडा शहरातील अचलपूर रस्त्यावर लाकुडबाजार परिसर आहे. या परिसरात ६० पेक्षा अधिक फर्निचर, बांबू, बल्ली, लाकडांची दुकाने आहेत. मुख्य मार्गावरील या दुकानातून मंगळवारी पहाटे ३.३० वाजता आगीचे लोट उठू लागले. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. लाकूड बाजाराच्या मागे ब्राह्मणसभा कॉलनी असल्याने आगडोंब पाहून नागरिक घाबरून गेले.

अग्निशमन दल कुचकामी
परतवाडा : अयुबभाई यांच्या फर्निचर दुकानापासून लागलेली आग हमीदभाई फर्निचरपर्यंत पसरली. मागील रांगेतील अलिम फर्निचरपासून पुढची दुकाने मात्र बचावली. लाकुडबाजारात अग्नितांडव सुरू असताना अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन वाहनात पाणीच नसल्याने पाणी भरण्यास लगेच परत गेले. घटनास्थळी उपस्थित तहसीलदार मनोज लोणारकर, ठाणेदार किरण वानखडे, नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्या मुलाने अखेर चांदूरबाजार व अंजनगाव येथून अग्निशमन वाहन बोलाविले. त्यानंतर सतत तीन वाहनांनी पाणी टाकून सकाळी १० वाजता आग आटोक्यात आणली.
काचघर दुकानाची सर्वाधिक हानी
मंगळवारी लागलेल्या या आगीत संजय जैन यांचे पौर्णिमा काच घराचे सर्वाधिक ७० लक्ष रुपयांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीमध्ये वालिब फर्निचर, अशोक दुबे यांचे बल्ली व बांबू विक्री केंद्र, हनिफ फर्निचर, मुन्ना फर्निचर, अयुब फर्निचर, गाझी फर्निचर, पूजा आॅटो पार्टचे गोदाम, टीप-टॉप फर्निचर, अहफाज फर्निचर आदी दुकानांची राखरांगोळी झाली. त्यामध्ये ५० लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पाण्याचा नळ नाही
लाकुडबाजार परिसर हा आग लागल्यावर अतिसंवेदनशील असताना नगरपालिका प्रशासनाच्यावतीने येथे एकही सार्वजनिक नळ दिलेला नाही. कुठल्याच दुकानात आपात्कालिन अग्निशमन यंत्र नसल्याचे या घटनमुळे उघडकीस आले आहे. घटनास्थळावर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार मनोज लोणारकर, ठाणेदार किरण वानखडे, सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नगरपालिकेचे पदाधिकारी पोहोचले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Loss of Rakharangoli crores of 11 shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.