अनाथालयातील मुलांसोबत ‘प्रेमदिन’
By admin | Published: February 15, 2017 12:14 AM2017-02-15T00:14:17+5:302017-02-15T00:14:17+5:30
रीमंत तरुण-तरुणी हॉटेल, मॉल व कॉफी शॉप, विविध ठिकाणी व्हॅलेन्टाईन डे साजरा करून लाखो रुपये खर्च करतात.
समाजासमोर आदर्श : निचत परिवाराचा पुढाकार
अमरावती : श्रीमंत तरुण-तरुणी हॉटेल, मॉल व कॉफी शॉप, विविध ठिकाणी व्हॅलेन्टाईन डे साजरा करून लाखो रुपये खर्च करतात. परंतु याला फाटा देऊन येथील हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ मनोज निचत व त्यांच्या परिवाराने येथील 'होलीक्रोस होम फॉर बेबी' या अनाथालयातील लहान मुलांसोबत 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करण्याचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील हास्यफुल्ले होेते.
तरुण- तरुणांमध्ये वेगळया प्रकारे 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करण्यात आला. अलीकडे तरुणांनी पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारणे सुरू केले आहे. पण नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले निचत परिवार यांनी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील २० मुले - मुलींना एक महिना पुरेल, असे दूध पॉवडर तसेच बिस्कीट, नवीन कपड्यांचा वाटप करण्यात आला.
यावेळी राजेंद्र निचत, शैलेश बहादुरे, कार्डीओलॉजीस्ट गौरव वसुले व श्रीकृष्ण हॉस्पिटलचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रेम वाटल्याने कमी होत नसून त्यात अधिक भर पडते, असे विचार यावेळी डॉ.मनोज निचत यांनी अनाथालयातील उपस्थित मुलांवर व्यक्त केले. (प्रतिनिधी)