अमरावती जिल्ह्यात पुन्हा लव्ह जिहाद? खासदार बोंडेंनी उघडकीस आणले प्रकरण

By गणेश वासनिक | Published: August 31, 2022 08:45 PM2022-08-31T20:45:00+5:302022-08-31T20:46:20+5:30

मुस्लिम समुदायला दिला गंभीर इशारा

Love jihad again in Amravati district? MP Anil Bonde exposed the matter | अमरावती जिल्ह्यात पुन्हा लव्ह जिहाद? खासदार बोंडेंनी उघडकीस आणले प्रकरण

अमरावती जिल्ह्यात पुन्हा लव्ह जिहाद? खासदार बोंडेंनी उघडकीस आणले प्रकरण

googlenewsNext

अमरावती : अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहादचा गंभीर प्रकार खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी बुधवारी  उघडकीस आणल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुस्लिमांकडून हिंदूंच्या मुलींना सातत्याने लक्ष केले जात असल्याने डॉ.बोंडे यांनी आक्रमक होत मुस्लिम समुदायाला गंभीर इशारा दिला आहे. मुस्लिमांनी आपली मुलं  सांभाळावी, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्हीही मागे हटणार नसल्याचा पवित्र घेतला आहे. 

जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने येथील उच्चविद्याविभूषित तरुणीला प्रेम जाळ्यात अडकवल्याचा प्रकार पुढे आला आहे. सदर युवकांने तीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्ट कडून अवैधरित्या लग्न लावून घेतले. हा संपूर्ण गंभीर प्रकार खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी उघडकीस आणला. प्रकरणातील पीडित मुलीची प्रकृती खालावल्याने तिला बुधवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी धाव घेत खासदार डॉ. बोंडे यांनी मुलीची व तिच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सर्वकष मदत करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तर दुसरीकडे डॉ. अनिल बोंडे यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून मुस्लिमांनी आपली मुलं सांभाळावीत अन्यथा हिंदूही त्याला जशास तसे प्रत्युत्तर देईल, असा दम सुद्धा त्यांनी भरला आहे. 

२० प्रकरणात अनेक मुली बेपत्ता 

जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने धारणी येथील प्रकाराला लगेच आळा घालण्यात यश आले. तर ग्रामीण पोलिसांची भूमिका सुद्धा या प्रकरणात संशयास्पद आहे. गत दोन वर्षात लव्ह जिहादच्या २० प्रकरणांमध्ये शेकडो मुली बेपत्ता झाल्या आहेत. अशा प्रकरणांवर वेळीच पायबंद घातला नाही तर त्यांचे जीवन उध्वस्त होईल. त्यामुळे पालकांनी सुद्धा अशा प्रकरणात सजग राहून काम करावे, मुलींनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सुद्धा खा.डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
 

Web Title: Love jihad again in Amravati district? MP Anil Bonde exposed the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.