पोलीस ठाण्यातच प्रेमीयुगुल विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 10:05 PM2018-07-25T22:05:39+5:302018-07-25T22:06:40+5:30

खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांच्या मध्यस्तीने प्रेमीयुगुलांचा विवाह बुधवारी पार पडला. युवा स्वाभिमानीचे विनोद गुहे यांच्या पुढाकारने प्रेमीयुगुलांना आपली संसारीक जीवनयात्रा सुरू करण्यास मोठी मदत मिळाली.

In love with the police, love is married | पोलीस ठाण्यातच प्रेमीयुगुल विवाहबद्ध

पोलीस ठाण्यातच प्रेमीयुगुल विवाहबद्ध

googlenewsNext
ठळक मुद्देखोलापुरी गेट पोलिसांची मध्यस्थी : युवा स्वाभिमानीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांच्या मध्यस्तीने प्रेमीयुगुलांचा विवाह बुधवारी पार पडला. युवा स्वाभिमानीचे विनोद गुहे यांच्या पुढाकारने प्रेमीयुगुलांना आपली संसारीक जीवनयात्रा सुरू करण्यास मोठी मदत मिळाली.
रविनगर येथील कैलासराव भोरे यांचा मुलगा व तेथीलच मनोहरराव राऊत यांची मुलगी या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, या विवाहाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते विनोद गुहे यांना भेटले. त्यानंतर विनोद गुहे यांनी दोन्ही परिवारातील सदस्यांना समजावून सांगून त्यांचा राग शांत केला. त्यानंतर दोन्ही परिवारातील सदस्यांना घेऊन प्रेमीयुगलांचा प्रेमविवाह खोलापुरी गेटचे पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे व आमदार रवि राणा यांचे स्वीयसह्ययक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात लावून दिला. कोणतेही भांडण तंटा न होऊ देता दोन्ही परिवारातील नातेवाईक व ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी विवाह समारंभात उपस्थित होते. यावेळी रत्नदीप पेठकर, खुफियाचे रवि लोंदे, सुनील कडू आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: In love with the police, love is married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.