‘त्या’ प्रेमालापाला पोलिसांचा वरदहस्त !

By admin | Published: February 15, 2017 12:09 AM2017-02-15T00:09:18+5:302017-02-15T00:09:18+5:30

‘क्रीडा संकुलाचे प्रवेशव्दार बनले प्रेमीयुगुलांचा अड्डा’ या शिर्षकाने ‘लोकमत’ने तरूण-तरूणींच्या प्रेमालापावर प्रकाशझोत टाकल्यानंतर मंगळवारी पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई करण्यात आली.

'That' loving school of love! | ‘त्या’ प्रेमालापाला पोलिसांचा वरदहस्त !

‘त्या’ प्रेमालापाला पोलिसांचा वरदहस्त !

Next

ठाणेदार म्हणतात, आवाज येत नाही : नियंत्रण कक्षाला फोन केल्यावर पोहोचले पोलीस
अमरावती : ‘क्रीडा संकुलाचे प्रवेशव्दार बनले प्रेमीयुगुलांचा अड्डा’ या शिर्षकाने ‘लोकमत’ने तरूण-तरूणींच्या प्रेमालापावर प्रकाशझोत टाकल्यानंतर मंगळवारी पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई करण्यात आली. क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर दररोज रात्री अल्पवयीनांचा राबता असताना त्याकडे गाडगेनगर पोलिसांनी केलेले दुर्लक्ष संतापजनक आहे.
यासंदर्भात गाडगेनगरचे ठाणेदार कैलास पुंडकर यांना फोन केला असता आवाज येत नसल्याचे कारण सांगून त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रेमीयुगुलांचा धुडगूस सुरूच असल्याने अखेर यासंदर्भात शहर नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर रात्री ८.१५ च्या सुमारास दामिनी पथक पोहोचले. त्या पाठोपाठ पोलिसांची मोबाईल व्हॅनही दाखल झाली. त्यांनी क्रिडा संकुल परिसरात फेरफटका मारला. परंतु पोलिसांना पाहून काही तरुण - तरुणींनी पळ काढल्याने पोलिसांच्या हाती काहीही लागले नसल्याचा अनुभव सोमवारी रात्री आला. सूर्य मावळल्यावर क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारालगत अंधाराचे साम्राज्य असल्याने हा परिसर प्रेमीयुगुल आणि टारगट तरूणांचे आश्रयस्थान बनला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून क्रीडा संकुल व्यवस्थापनाने येथे भरपूर प्रकाश देणारी वीज यंत्रणा उभारावी, अशी मागणी समोर आली आहे.
परिसरात तरूणींची छेडही काढली जाते. तथापि बदनामी होऊ नये यासाठी अनेक तरूणी पोलीस स्टेशनची पायरी चढत नाहीत. त्या मानसिकतेचा गैरफायदा काही माथेफिरू तरूण उठवत असून या भागात अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन उपसंचालकांकडे असून व्यापक पसारा असलेल्या क्रीडा संकुलाची देखरेख करण्यासाठी कुठलाही सुरक्षारक्षक नसल्याने काहींच्या प्रेमालापाला बहर आला आहे. अप्रिय घटना टाळण्यासाठी या भागात पोलिसांनी रात्रकालिन गस्त घालावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सोमवारी व्हॅलेन्टाईन डे च्या पुर्वसंधेला शहरात अनेक ठिकाणी तरुणाईने हैदोस घातला. त्यामुळे सोमवारी शहरभर पोलीसांनी नजर ठेवली होती. मंगळवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने अन्य दिवसांच्या तुलनेत विभागीय क्रीडा संकुलाच्या आसपासच्या परिसरातही सख्या-हरींची भर पडली होती.
तरूणांचे आणि तरूणींचे थवे विभागीय क्रीडा संकूल परिसरात विसावत असल्याने आईसक्रीम पार्लर आणि कॉफी शॉपचा व्यवसाय आश्चर्यजनकरित्या फोफावला आहे. ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंतची कॉफी आणि असेच महागडे आईसक्रीम तेथे विकले जाते. पाण्याचेही पैसे मोजावे लागतात. तरूणाईला हवे ते करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याने तरूणाईही अव्वाच्या सव्वा पैसे मोजतात. (प्रतिनिधी)

सुरक्षा रक्षकांची तैनाती केव्हा?
विभागीय क्रीडा संकुलाचे उजव्या बाजूचे प्रवेशव्दार रात्री बंदच असते. या ठिकाणी प्रकाश दिवे सुद्धा लावण्यात आले नसून येथे सुरक्षा रक्षकही तैनात नसतो. त्यामुळे सुरक्षा रक्षक केव्हा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे विभागीय क्रीडा संकुल समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून येथे तातडीने सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे.

पोलिसांना पत्र देणार
प्रवेशव्दार उघडे ठेवल्यास अपघाताची शक्यता आहे. विभागीय क्रीडा संकुलाच्या देखरेखीसाठी आमच्याकडे कुठलाही अतिरिक्त निधी नसल्याने सुरक्षारक्षक तैनात करणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया विभागीय क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे येथील गस्त वाढविण्यात येईल आणि या भागात आक्षेपार्ह प्रकार वा घटना होत असतील तर याबाबत पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अन् सिगारेट ओढणाऱ्या तरुणीने ठोकली धूम
सोमवारी वेलकम पाँईटनजिक पोलिसांच्या गस्तीदरम्यान एक तरूणी आपल्या समवयस्क मित्रासमवेत सिगरेट ओढताना आढळली. तेवढ्यातच दामिनी पथक त्यांच्याकडे पोहोचले. मात्र त्यांना हटकण्यापूर्वीच त्या उभयतांनी तेथून दुचाकीवरून पळ काढला.

Web Title: 'That' loving school of love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.