कमी टक्क्यांत कर्जाचा मॅसेज आला, म्हणून ॲप डाऊनलोड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:19+5:302021-07-26T04:11:19+5:30

प्रदीप भाकरे अमरावती : कोरोना काळात अनेक जण बेरोजगार झालेत. अनेकांच्या नाैकऱ्या गेल्यात. अनेकांचे बँक हप्ते थांबले. जुने कर्ज ...

Low percentage loan message received, so do not download the app | कमी टक्क्यांत कर्जाचा मॅसेज आला, म्हणून ॲप डाऊनलोड करू नका

कमी टक्क्यांत कर्जाचा मॅसेज आला, म्हणून ॲप डाऊनलोड करू नका

Next

प्रदीप भाकरे

अमरावती : कोरोना काळात अनेक जण बेरोजगार झालेत. अनेकांच्या नाैकऱ्या गेल्यात. अनेकांचे बँक हप्ते थांबले. जुने कर्ज फेडण्यासाठी दुसरा अल्प भांडवलात रोजगार करावा, तर पदरमोड करण्यासाठीही काही नाही. नेमकी ही परिस्थिती हेरून सायबर गुन्हेगार सक्रिय झालेत. अनेक बँकांचा व्याजदर वाढीव, तर अनेक बँकांनी जुने कर्ज आहे म्हणून नवीन कर्ज नाकारले. असे हतबल झालेले लोक या सायबर गुन्हेगारांनी हेरले. कमी व्याजदरात कर्ज मिळेल, तेही एक तासात, कुठलेही कागदपत्रे नकोत, अशी बतावणी केली जाते. ॲपची लिंक पाठविली जाते. अन्‌ सुरू होताे फसवणुकीचा गोरखधंदा. ॲप डाऊनलोड करताच माहिती भरण्यास सुचविले जाते. लोन मंजूर झाल्याचा संदेश झळकतो. मात्र, कर्ज हवे असल्यास ‘प्रोसेसिंग फी’ भरावी लागेल. ती रक्कम भरली की, कर्ज तर मिळतच नाही. पण अनेकजण स्वत:च्या खात्यातील उरलीसुरली पुंजीदेखील गमावून बसतो.

ही घ्या काळजी

१) कुठलेही ॲप अकारण डाऊनलोड करू नका

२) मोबाईलचा वापर करताना कोणत्याही मेसेजला लागलीच प्रतिसाद देऊ नका. मेसेजच्या खऱ्या-खोट्याची खात्री करा.

३) चुकीच्या आणि अपूर्ण माहितीच्या ॲपला प्रतिसाद देऊ नका. शंका असल्यास पोलिसांशी संपर्क करा

ॲप डाऊनलोड करताच बँक खाते साफ

१) काम सुुलभ होण्यासाठी मोबाईलचा वापर नित्याचा झाला असला, तरी आपण कशासंबंधीचे ॲप डाऊनलोड करतो याची खात्री करा. प्रलोभनाला बळी पडू नका.

२)ॲप डाऊनलोड करताच बँक खाते साफ झाले, अशा अनेक तक्रारी अलीकडे वाढू लागल्या. त्या माध्यमातून वृत्तदेखील प्रकाशित होत आहे.

३) सायबर गुन्हेगारीसंदर्भात सायबर पोलीस ठाण्याकडून वारंवार जनजागृती केली जाते. तेदेखील अंगिकारणे आवश्यक आहे.

या आमिषापासून सावधान

१) मॅसेजच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक संदर्भातील काही मजकूर येऊ शकतो. तो मजकूर फसगत ाकरणारा असू शकतो.

२) अन्य बँकेकडून कर्ज मिळविण्याची प्रक्रिया क्लिष्ट असताना एखादा कंपनी वा ॲपवरील संस्था कमी व्याजदरात कर्ज तेही तासाभरात, कुठलेही कागदपत्र न घेता देण्याची हमी देत असेल, तर सावधान.

३) अल्प प्रोसेंसिंग फी भरा, तासाभरात विनासायास कर्ज मिळवा, या आमिषाला बळी पडू नका.

यांच्याप्रमाणे तुम्हीही फसू शकतो.

केस १ : समाजमाध्यम न्याहाळत असताना तासाभरात कर्ज मिळवा, अशी जाहिरात दिसली. ती लिंक डाऊनलोड करून त्यात काही प्राथमिक माहिती व बँक खाते क्रमांक टाकला. तासाभरात खात्यातील ७० हजार रुपये परस्पर वळती झाले.

केस २

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज इनबॉक्समध्ये झळकला. ॲप डाऊनलोड करून माहिती भरली. ३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचा मॅसेजदेखील झळकला. मात्र, त्यानंतर एका मोबाईलधारकाने संपर्क साधून ३ लाखांच्या कर्जासाठी २ टक्के प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असे बजावले. सहा हजार गेले, कर्जही मिळाले नाही.

कोट

कमी टक्क्यांनी कर्ज मिळते आहे, म्हणून हरखून जाऊ नका, तासाभरात विनाकागदपत्र कर्ज देण्याची बतावणी करणाऱ्यांची खातरजमा करा. अननोन लिंकवर क्लिक करू नका, खातेक्रमांक देऊ नका. ऑनलाईन व्यवहार करताना कमालीचे सजग राहा.

- सीमा दाताळकर,

पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

Web Title: Low percentage loan message received, so do not download the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.