गारपीट न झालेल्या भागातही कमी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:28 AM2018-02-16T01:28:27+5:302018-02-16T01:28:49+5:30
या आठवड्यातील गारपिटीने तालुक्यात २४५० हेक्टरवरील संत्रा व ११५० हेक्टरवरील गहू-हरभरा पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आंबिया बहराची संत्री गळून पडली, तर मृगाचा संत्रा झाडांखाली पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : या आठवड्यातील गारपिटीने तालुक्यात २४५० हेक्टरवरील संत्रा व ११५० हेक्टरवरील गहू-हरभरा पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आंबिया बहराची संत्री गळून पडली, तर मृगाचा संत्रा झाडांखाली पडला. त्यामुळे व्यापारी व संत्रा खरेदीदार १५०० रुपये प्रतिहजार दराने मागणी करीत आहेत.
गारपीट होण्यापूर्वी मृग बहराच्या संत्र्याला दरहजारी ३५०० ते ४५०० रुपये दराने मागणी होती. आता ज्या भागात गारपीट झालेली नाही, तेथेही व्यापारी कमी भावाने संत्री मागत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
कृषी अधिकारी, तहसीलदार, तलाठी व संबंधित कर्मचारी नुकसानाबाबत शेतकºयांच्या शेतात जाऊन अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाची पाहणी करीत आहे. तथापि, शेतकऱ्यांना मोबदला मिळेपर्यंत त्यांच्यावर टांगती तलवार आहे.
गारपिटीने संत्राफळ थोडाफार खराब झाला. भाव मात्र कमालीचे घसरले आहेत. व्यापारी या परिस्थितीचा योग्य फायदा घेत आहेत.
- नीलेश रोडे,
संत्राउत्पादक, मोर्शी
गारपिटीने शेतकºयाच्या संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व्यापारी या बाबीचा गैरफायदा घेत आहे. शासनाने शेतकºयांना तातडीची मदत करावी.
- बंडू साऊत, शेतकरी
निसर्गाच्या अवकृपेने खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, कपाशीची हानी झाली. आता तीन दिवस गारपीट झाल्याने संत्रा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. शेतकºयाला निसर्ग जगू देत नाही, शासनही पाठीशी उभे नाही.
- मोरेश्वर गुडधे, शेतकरी, डोंगरयावली