अंजनगाव बारीत लम्पीचा पहिला बळी; पशुवैद्यकीय केंद्रात लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा

By गणेश वासनिक | Published: October 7, 2022 03:54 PM2022-10-07T15:54:30+5:302022-10-07T15:56:06+5:30

पशुवैद्यकीय केंद्रात लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला.

Lumpy's first death in Anjangaon Barit; Claim that vaccinations are completed at a veterinary center | अंजनगाव बारीत लम्पीचा पहिला बळी; पशुवैद्यकीय केंद्रात लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा

अंजनगाव बारीत लम्पीचा पहिला बळी; पशुवैद्यकीय केंद्रात लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा

Next

अंजनगाव बारी - गावात लम्पी स्कीन डीसीजचा पहिला बळी राजेंद्र पोकळे यांच्याकडील बैल ठरला आहे. १५ दिवस उपचार व लसीकरणानंतरही ६ ऑक्टोबर रोजी हा बैल दगावला. दुसरीकडे पशुवैद्यकीय केंद्रात लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला.

अंजनगाव बारी येथील पशुसंवर्धन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयता माहोरे यांच्याशी संपर्क साधला असता, घरोघरी जाऊन पूर्णपणे लसीकरण झाले असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. पशुपालक व शेतकऱ्यांनी वेळेवर लसीकरण व लक्षणे दिसल्यास स्थानिक पशुसंवर्धन वैद्यकीय दवाखान्यात पशूंना आणून योग्य उपचार व काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 

Web Title: Lumpy's first death in Anjangaon Barit; Claim that vaccinations are completed at a veterinary center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.