सौदी अरेबियात नोकरीचे आमिष, बेरोजगारांची लाखोंची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:38 PM2023-07-10T12:38:18+5:302023-07-10T12:39:36+5:30

बंगळुरूच्या जोडीकडून ४ लाख ३४ हजारांनी फसवणूक, गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील घटना

Lure of job in Saudi Arabia, snatched millions from unemployed youth | सौदी अरेबियात नोकरीचे आमिष, बेरोजगारांची लाखोंची फसवणूक

सौदी अरेबियात नोकरीचे आमिष, बेरोजगारांची लाखोंची फसवणूक

googlenewsNext

अमरावती : सौदी अरेबियात नोकरी लावून देण्यासह त्यासाठी लागणारा व्हिसा, पासपोर्ट बनवून देण्याचे आमिष दाखवून येथील काही बेरोजगारांची तब्बल ४ लाख ३४ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. त्यांचे पासपोर्टसुद्धा ठेवून घेण्यात आले. ही घटना ८ जुलै रोजी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी मकसूद खान मेहमूद खान (४२, रा. पॅराडाइज कॉलनी) यांच्या तक्रारीवरून हमीदुल्ला (५५) व रियाज अहेमद (६०, दोघेही रा. बंगळुरू) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

येथील मकसूद खान हे चांगल्या नोकरीच्या शोधात होते. त्याचवेळी त्यांना महेदवीय माइंड ग्रुप नामक व्हॉट्सॲप ग्रुपवर नोकरी संदर्भातील एक जाहिरात दिसली. त्यामुळे त्यांनी त्या ग्रुपवर पोस्ट अपलोड करणाऱ्या हमीदुल्ला याच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. नोकरीबाबतची माहिती खरी आहे का?, अशी विचारणा केली. त्यावर त्याने बेरोजगारांना देश-विदेशात नोकरी लावून देण्यासोबतच त्यांचे पासपोर्ट व व्हिसा बनविण्यास आपण मदत करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे मकसूद खान व त्याच्या काही मित्रांनी हमीदुल्ला खानवर विश्वास दाखविला. त्याने स्वत:ची ओळख व्हिसा एजंट म्हणून देखील करून दिली. हमीदुल्ला याने मकसूद खान व अन्य काही जणांना यांना मेडिकल व व्हिसा बनविण्यासाठी बंगळुरूला बोलविले.

अशी उकळली रक्कम

दोन्ही आरोपींनी व्हिसा बनविण्यासह इतर वेगवेगळी कारणे सांगून मकसूद खान यांच्याकडून १ लाख २२ हजार रुपये, झिशान अहमद खान याच्याकडून ६७ हजार २०० रुपये, मिर्झा नईम बेगकडून ६५ हजार २०० रुपये व कासिफ खान याच्याकडून १५ हजार २०० रुपये तर इतर काही अशा सर्वांकडून एकूण ४ लाख ३४ हजार २०० रुपये उकळले. तसेच त्यांच्याजवळील पासपोर्टसुद्धा स्वत:कडे ठेवून घेतले. मात्र, रक्कम घेऊनही त्यांना नोकरी देण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मकसूद खान यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Lure of job in Saudi Arabia, snatched millions from unemployed youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.