खारपाणपट्ट्यात शिंपल्यांची शेती, शेततळ्यात पिकवले मोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:46 AM2018-03-23T00:46:03+5:302018-03-23T00:46:03+5:30

तालुका खारपाणपट्टा असून, येथील शेतकरी हा नैसर्गिक पाण्यावरच अवलंबून राहतो. मात्र, याला एक शिक्षक अपवाद ठरला आहे.

Mackerel farming, pearl grown in the field | खारपाणपट्ट्यात शिंपल्यांची शेती, शेततळ्यात पिकवले मोती

खारपाणपट्ट्यात शिंपल्यांची शेती, शेततळ्यात पिकवले मोती

Next

सचिन मानकर ।
ऑनलाईन लोकमत
दर्यापूर : तालुका खारपाणपट्टा असून, येथील शेतकरी हा नैसर्गिक पाण्यावरच अवलंबून राहतो. मात्र, याला एक शिक्षक अपवाद ठरला आहे. त्यांनी खासगी शिक्षकी पेशा साडून चक्क खारपाणपट्ट्यात अनोखा प्रयोग राबवित शिंपल्यातून मोती पिकविले आहे. मनोज ढोरे असे त्या शिक्षकांचे नाव असून, ४ ते ५ लाखांचे उत्पन्न सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दर्यापूरहून पाच कि.मी. अंतरावर एका शेततळ्यात सहा फुटाचा खड्डा करून त्यात पर्ल फार्मिंग केले आहे. ५० हजार रूपये गुंतवून ढोरे यांनी हा प्रयोग बारविल्याचे सांगितले.
१४ महिन्यांनंतर शिंपल्यावर लेअर चढल्यानंतर मोती तयार होतो. तीन इंचाच्या शिंपल्यात दोन मोती दोन, तर सहा वर्षांच्या शिंपल्यामध्ये सर्वोच्च दर्जाचे मोती तयार होऊ शकतात. यामध्ये लोमीलीडेन्स, लौमीलीटेन्स, पेरोशिया कोरूगाटा, अशा प्रजातींचे शिंपले तयार होतात. मोत्याची शेती १० बाय १० मीटरच्या सिमेंट टँकमध्येही हे शक्य आहे. डिझाईनर मोती, जसे की गणपती, गौतमबुद्ध, साईबाबांच्या मूर्ती या शिंपल्यापासून करणे शक्य आहे. असे मत ढोरे यांनी व्यक्त केले. एक एकराच्या पारंपरिक शेतीत ५० हजार रुपयापर्यंत नफा होऊ शकतो. मोत्याच्या शेतीमध्ये १० ते १२ लाखांचे उत्पन्न घेता येते. गोड पाण्यामध्ये मोती संवर्धनासह विविध योजनांचा लाभ घेऊन ६ ते ८ प्रकारे व्यवसाय करू शकतो. मोत्याची मागणी विदेशात असल्याने चांगली बाजारपेठ मिळू शकते. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, राजस्थानमध्ये आणखी मोती संवर्धन संबंधित माहितीसाठी इंडियन सेल्स पर्ल फार्मिंग सेंटर, दर्यापूर मोती फार्म आणि ट्रेनिंग सेंटर तयार करण्याचा मानस ढोरे यांनी व्यक्त केला.
दर्यापूर तालुक्यात अनोखा प्रयोग : पाच लाखांचे उत्पन्न
दीड हजारांपर्यंत किंमत

५०० स्के. फूट तलावात ५०० शिंपल्यांपासून पर्ल फार्मिंग करण्यात येऊ शकते. पाणी ट्रिटमेंट, इन्स्टुमेंट, ईफ्रास्ट्रक्चरवर २० हजार खर्च होतो. एक मोत्याची बाजार किंमत ३०० रुपयांपासून तर १५०० रुपयापर्यंत मिळू शकते. बाजारपेठ सहज उपलब्ध होते.
असा तयार होतो शिंपल्यात मोती
शिंपल्यामधून लाळ निघते. कॅल्सियम कार्बाेनेट सहित आठ प्रकारच्या पावडरपासून बनविल्या जातो. न्युक्लिअस (मोती बीज) जिवंत शिंपल्याचे दोन सेंटीमीटर तोंड उघडून त्यामध्ये न्युक्लीअस प्लॉन्ट करता येतो. ज्या आकाराची फॉरेन बॉड शिंपल्यामध्ये टाकल्या त्या डिझाईनचा मोती तयार होतो.

खारपाणपट्ट्यात हा एक नवीन प्रयोग करण्याचा मानस होता. त्या दृष्टीने कामास लागून अशा प्रकारे शिपल्यांतून डिझाईनर मोत्यांची शेती करण्याचा व्यवसाय थाटला आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न येणार आहे.
- मनोज ढोरे,
प्रयोगशील शेतकरी

Web Title: Mackerel farming, pearl grown in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.