मागासवर्गीयांच्या निधीवर मनपाचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:55 PM2018-03-11T23:55:34+5:302018-03-11T23:55:34+5:30
दोन वर्षांपासून प्रभाग क्र. १०, संजय गांधी नगर नं. २, पंचशीलनगर, लुंबिनीनगर, वडरपुरा, उत्तमनगर येथील रमाई आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : दोन वर्षांपासून प्रभाग क्र. १०, संजय गांधी नगर नं. २, पंचशीलनगर, लुंबिनीनगर, वडरपुरा, उत्तमनगर येथील रमाई आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले आहेत. सदर घरकुल शासनाने २०१५ लाच रमाई आवास योजनेला ४० कोटी रुपयांचा निधी मनपाला दिला. परंतु, मागासवर्गीयांचा निधी असल्यामुळे सदर निधी गोरगरीबांच्या कल्याणार्थ न लावता मनपाने सदर मागासवर्गीयांच्या निधीवरच डल्ला मारून रमाई आवास योजनेचा निधी इतर विभागामध्ये वळती केला आहेत. याचबरोबर मनपाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या कामचुकार वृत्तीमुळे अनेक नागरिकांवर अन्याय होत आहे.
रमाई आवास योजनेच्या निधीतून मनपाला मागील अनेक वर्षांपासून बँकेतर्फे व्याज मिळत असून सदर व्याजाचे रक्कमेमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार होऊन मनपाने सदर योजनेत घोटाळा केल्याचे निष्पन्न होते. तेव्हा ताबडतोब प्रभाग क्र. १० मधील नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ घ्यावा, असे ठिय्या आंदोलनाद्वारे मनपा आयुक्तांना मनपाचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक मंगेश मनोहरे, मिनी महापौर तथा प्रभाग क्र. १० च्या नगरसेविका माला देवकर यांनी निवेदन दिले. ठिय्या आंदोलनामुळे तीन दिवसांत प्रभागातील नागरिकांना घरकुल देण्याचे लेखी आश्वासन मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी दिले. प्रभागातील योगेश देवकर, सदाशिव शंभरकर, वंदना गडलिंग, अनुसया वानखडे, संगीता मोहोड, रेखा पुडके, ललीता गावंडे, अनिता डोंगरे, मीना खडसे, उषा मेश्राम, कमला बोहरिय्या, सुनंदा मेश्राम, प्रमिला साबळे, रंजना गणवीर, श्यामराव मेश्राम, द्रोपदा चौधरी, सक्सेन श्यामकुंवर, सरोज मनवर, दिलीप घोडे, संभाजी वाघमारे, अशोक भोगे आदी उपस्थित होते.