मेळघाटात मग्रारोहयोची कामे; स्थलांतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:00 AM2020-10-22T05:00:00+5:302020-10-22T05:00:23+5:30

मेळघाटात कोरडवाहू आणि डोंगरी शेतजमीन असल्याने आदिवासी शेतकरी कसेतरी त्यातून एक पीक घेतात. यंदा मात्र सोयाबीन मोठ्या प्रमाणात कुजल्याने नुकसान झाले. त्यामुळे येथील आदिवासी मजूर महिनाभरापासून अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापणी व मिळेल त्या रोजंदारीच्या कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. पूर्वी दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे मिळणारा कापणीचा दर आता १३०० ते १६०० रुपये क्विंटलपर्यंत दिला जात आहे.

Magrarohyo's works in Melghat; Migration begins | मेळघाटात मग्रारोहयोची कामे; स्थलांतर सुरू

मेळघाटात मग्रारोहयोची कामे; स्थलांतर सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देफसवणूक, अपघात : आदिवासी मजूर पठारावरील भागांमध्ये जुंपले सोयाबीन कापणीला

नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/चिखलदरा : मेळघाटातील डोंगरी भागातून सोयाबीन कापण्यासाठी हजारो आदिवासी मजूर जिल्ह्याच्या पठारी भागात स्थलांतरित झाले आहेत. मेळघाटात डिसेंबर महिन्यांपर्यंत मग्रारोहयो अंतर्गत कामांचे नियोजन असताना, हजारोंच्या संख्येने झालेल्या स्थलांतरात फसवणूक आणि अपघाताचे प्रकार आता वाढू लागले आहेत.
मेळघाटात कोरडवाहू आणि डोंगरी शेतजमीन असल्याने आदिवासी शेतकरी कसेतरी त्यातून एक पीक घेतात. यंदा मात्र सोयाबीन मोठ्या प्रमाणात कुजल्याने नुकसान झाले. त्यामुळे येथील आदिवासी मजूर महिनाभरापासून अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापणी व मिळेल त्या रोजंदारीच्या कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. पूर्वी दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे मिळणारा कापणीचा दर आता १३०० ते १६०० रुपये क्विंटलपर्यंत दिला जात आहे. शेतजमीन किती एकर आहे, हे आदिवासींना समजत नसल्याने काही जण कमी शेतजमीन सांगून फसवणूक करतात. मजुरीचे काम देणारा दला एकरामागे १०० ते २०० रुपये कापून घेतो. परजिल्ह्यात रात्रंदिवस काम करूनही मजुरी न देता हाकलून लावून दिल्याचेही प्रकार आदिवासींसोबत मोठ्या प्रमाणात घडत आहेत. दुसरीकडे अपघातात जीव गमवावा लागत असल्याचे प्रकार वाढले आहेत.

डिसेंबरपर्यंत मग्रारोहयोच्या कामाचा शेल्फ
मेळघाटातील आदिवासी मजूर स्थलांतरित होऊ नये, त्यांना गावातच कामे मिळावी, यासाठी महसूल व पंचायत समितीच्यावतीने मोठ्या प्रमाणात कामे उघडण्यात आली आहेत. डिसेंबरपर्यंत कामाचा ह्यशेल्फह्ण तयार करण्यात आला असल्याची माहिती चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी दिली. तालुक्यातील गावांमध्ये कामाची मागणी होताच मग्रारोहयो अंतर्गत कामे सुरू केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अचलपूर तालुक्यात सोयाबीनचे पीक पावसामुळे कुजले. असदपूर व परिसरात दरवर्षीप्रमाणे मेळघाटातील आदिवासींकडून प्रतिएकर दराने कापणी करवून घेतली जात आहे.
- प्रवीण साबळे
शेतकरी, असदपूर

Web Title: Magrarohyo's works in Melghat; Migration begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Melghatमेळघाट