खापर्डेवाड्यासमोर महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:03 PM2018-01-20T23:03:31+5:302018-01-20T23:04:38+5:30

Mahaaarti before Khapardewadi | खापर्डेवाड्यासमोर महाआरती

खापर्डेवाड्यासमोर महाआरती

Next
ठळक मुद्देगजाननभक्तांत नाराजी : वाड्यात प्रवेश करण्यास मालकाची मनाई

आॅनलाईन लोकमत
अमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे हयात असताना शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांचे या वाड्यात आगमन झाल्याचा उल्लेख दासगणू महाराजांच्या पोथीत आहे. त्यामुळे या वाड्याला ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु, या वाड्याच्या मालकांनी आयोजकांना या ठिकाणी जाण्यास मनाई केल्याने दिंडीतील भाविकांना पूजा बाहेरच करावी लागली. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर असून, येथील प्रवेशद्वाराजवळच प्रतिमा ठेवून पूजा करण्यात आली.
श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांनी महाराजांची श्रद्धेने पूजा केली होती. महाराजांची त्यावेळी खापर्डे वाड्यात काही काळ विश्रांती घेतली होती. पण, ज्या व्यापाऱ्याला दादासाहेबांच्या वंशजांनी हा वाडा विकला, त्याने सदर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ‘श्रीं’च्या भक्तांना खापर्डे वाड्यात जाण्यास मनाई केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर वाड्याच्या प्रवेशद्वारावरच ट्रॅक्टर उभा केला. त्यामुळे भाविकांना वाड्यात जाता आले नाही. वाद नको म्हणून भाविकांनी खापर्डे वाड्यात जाण्याचे टाळले. परंतु, या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. ज्या तख्तावर साक्षात गजानन महाराज बसले होते, तो तख्त बंडू पेटकर यांनी जतन केला आहे. तो तख्त शनिवारी पूजेसाठी खापर्डेवाड्यासमोर आणला होता. या तख्तावर ‘श्रीं’ची प्रतिमा ठेवण्यात आली होती. महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर भाविकांना प्रसाद म्हणून साबूदाना खिचडीचे वाटप करण्यात आले.

Web Title: Mahaaarti before Khapardewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.