महाबीजनेच ठगविले, विश्वास ठेवायचा कुणावर?

By Admin | Published: November 29, 2014 12:20 AM2014-11-29T00:20:29+5:302014-11-29T00:20:29+5:30

शासनाची अंगीकृत कंपनी असणाऱ्या ‘महाबीज’वर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले.

Mahabija only cheated, believe kun? | महाबीजनेच ठगविले, विश्वास ठेवायचा कुणावर?

महाबीजनेच ठगविले, विश्वास ठेवायचा कुणावर?

googlenewsNext

गजानन मोहोड अमरावती
शासनाची अंगीकृत कंपनी असणाऱ्या ‘महाबीज’वर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र उगवणशक्तीअभावी खरिपाच्या पेरणीला मोड आली, तक्रारी केल्या, पाहणी झाली. परंतू मोबदला मिळालाच नाही, विश्वास ठेवायचा कुणावर? असा संतप्त सवाल पूर्णानगर येथे महाबीजकडून फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यातील पूर्णानगर व परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी पूर्णानगर येथील सुमित कृषी सेवा केंद्र व यश कृषी सेवा केंद्रातून शासनाची अंगीकृत कंपनी असणाऱ्या ‘महाबीज’ या बियाणे कंपनीचे ३३५ या जातीचे वाण खरेदी केले व त्याची पेरणी केली. लॉट नंबर (ओसीटी-१३-१३-३८०६-४०३४) हे बियाणे पेरणीपश्चात उगवलेच नाही. आठ दिवस बियाणे उगवण्याची वाट पाहिल्यानंतर पूर्णानगर, येलकी, वातोंडा, मार्की, मिर्झापूर, अंचलवाडी, उमरटेक, सावणपूर येथील शेतकऱ्यांनी भातकुली पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली. कृषी अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी न करता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक
शेतकऱ्यांनी तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेव्हा कुठे तक्रार निवारण समितीने पाहणी केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर कामुने यांनीदेखील पूर्णानगर येथे जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान महाबीजचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी बियाणे परतावा देण्याचे मान्य केले, असे शेतकरी सांगतात. परंतु आजतागायत त्यांना ना बियाने परतावा किंवा ना रोख स्वरुपात भरपाई मिळाली. कुठल्या बियाणे कंपन्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा कसा, असा त्यांचा संतप्त सवाल आहे.
वांझोट्या सोयाबीनची उगवणशक्ती दाखविली ७१ टक्के
लॉट क्रमांक ४०१५, ४०३४, ४०१६ व ४००९ मधील सोयाबन ३५५ जातीचे बियाणे खरेदी केले. या बियाण्यांना महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला यांनी मुक्तता अहवाल (रिलीज रिपोर्ट) १७ फेब्रुवारी २०१४ ला दिला यामध्ये लॉट क्रमांक ४०३४ मधील बियाण्यांची उगवणक्षमता ७१ टक्के असल्याचे दर्शविण्यात आले. यावर ओ.आय.खान, कृषी अधिकारी, एस.जी.ए. परभनी यांची स्वाक्षरी आहे. हाच नमुना नागपूर येथील प्रयोगशाळेत तक्रारीनंतर पाठविला असता उगवनशक्ती केवळ ११ टक्के असल्याचे नमूद आहे. म्हणजेच महाबीजने अप्रमाणीत बियांची उगवनशक्ती अधिक असल्याचे दर्शवून शेतकऱ्यांची फसवनूक केली आहे.
‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित करा
उगवनशक्ती नसणारे महाबीजचे बियाणे कुणी पास केले, कुठल्या अधिकाऱ्याने वांझोट्या सोयाबीन बियाण्यांच्या लॉटला परवानगी दिली याची चौकसी व्हायला व्हवी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अश मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

Web Title: Mahabija only cheated, believe kun?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.