महाबीजचे वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 10:07 PM2018-07-04T22:07:59+5:302018-07-04T22:08:17+5:30

यंदाही महाबीजचे सोयाबीनचे बियाणे वांझोटे निघाल्याने असदपूर परिसरातील २०० हेक्टरवर क्षेत्रात मोड आलेली आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन बियाण्यांना प्रमाणित कसे दाखविले, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.

Mahabija's vinjota seed farmers' forerunners | महाबीजचे वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

महाबीजचे वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

Next
ठळक मुद्देउगवणच नाही : पेरणीला मोड, दुबार पेरणीची धास्ती, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाही महाबीजचे सोयाबीनचे बियाणे वांझोटे निघाल्याने असदपूर परिसरातील २०० हेक्टरवर क्षेत्रात मोड आलेली आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन बियाण्यांना प्रमाणित कसे दाखविले, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे.
गतवर्षीच्या खरिपात कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्याने यंदा शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे जास्त आहे. तसेच पाऊसदेखील उशिरा झाल्याने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतली मूग, उडदाचे पीक बाद होऊन सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे अचानकपणे सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले आहे. शेतकऱ्यांना परमीटवरील एक बॅग सोयाबीन बियाणे देखील मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल आहेत. अचलपूर तालुक्यात असदपूर, कोल्हा, काकडा, ईसापूर, रासेगाव आदी परिसरात महाबीजच्या ९३०५ व ३३५ या सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक असतांना तुरीची उगवण चांगली झाली. त्यामुळे पावसाचा खंड आदी कुठलेही कारण या ठिकाणी नाही. शासन अंगीकृत कंपनी असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)च्या बियाण्यांवर विश्वास ठेवून खरेदी केली, तर ‘भरवश्याच्या म्हशीने रेडा दिला’ त्यामुळे दुबार पेरणीसाठी महाबीजने चांगल्या प्रतिचे बियाणे उपलब्ध करावे व नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.

Web Title: Mahabija's vinjota seed farmers' forerunners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.