आज दिसणार महाचंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:27 PM2017-12-02T23:27:48+5:302017-12-02T23:28:22+5:30
पृथ्वीपासून चंद्राचे अंतर सरासरी ३ लाख ८५ हजार किमी एवढे राहते. परंतु, ३ डिसेंबर रोजी चंद्र ३ लाख ५७ हजार ९८७ किमीपर्यंत पृथ्वीच्या जवळ येतो.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : पृथ्वीपासून चंद्राचे अंतर सरासरी ३ लाख ८५ हजार किमी एवढे राहते. परंतु, ३ डिसेंबर रोजी चंद्र ३ लाख ५७ हजार ९८७ किमीपर्यंत पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे रविवारी तो सर्वात मोठ्या आकारात व प्रकाशमान दिसणार आहे.
चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळाच्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा ५९ टक्के भाग नेहमी पाहता येतो. परंतु ३ डिसेंबरला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ येत असल्याने त्याचे अंतर ३ लाख ५७ हजार किमीच्या आत राहणार आहे. त्यामुळे तो ९८.४ टक्के पाहायला मिळणार आहे. यालाच सुपरमून असेही म्हणतात. रविवारी रात्री दिसणारा सुपरमून खगोलशास्त्र अभ्यासकांनी अवश्य पहावा. हा सुपरमून घराच्या छतावरून वा अंगणातूनही अगदी साध्या डोळ्यांनी पाहणे शक्य आहे, अशी माहिती एस.आर.पी. कॅम्प स्थित हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.