अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:13 AM2021-05-18T04:13:23+5:302021-05-18T04:13:23+5:30
दर्यापूर : खरीप हंगामात प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनी कीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी ...
दर्यापूर : खरीप हंगामात प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनी कीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी २० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके केली जातात. सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कापूस, मका या पिकांमध्ये मिनी कीट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. बियाणे मिनी कीटसाठी जिल्ह्याचा समावेश तूर आणि मूग पिकाकरिता करण्यात आला आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये तूर, मूग यापैकी एका पिकाचे चार किलो एक बियाणे मिनी कीट देण्यात येईल. अनुदानापेक्षा अधिक असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावयाची आहे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार यांनी केले आहे.