अंबा-एकवीरा देवी मंदिरातील महाप्रसाद भाविकांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:20 PM2018-10-14T22:20:38+5:302018-10-14T22:21:12+5:30
अंबा-एकविरा देवी संस्थानतर्फे पत्रिका वाटून घेण्यात येणारा महाप्रसादाचा कार्यक्रम यंदा खुला करण्यात आला . नवरात्रोत्सवात आतापर्यंत दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद खुला करण्यात आल्याने सर्वसामान्य भक्तगणांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबा-एकविरा देवी संस्थानतर्फे पत्रिका वाटून घेण्यात येणारा महाप्रसादाचा कार्यक्रम यंदा खुला करण्यात आला . नवरात्रोत्सवात आतापर्यंत दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद खुला करण्यात आल्याने सर्वसामान्य भक्तगणांना दिलासा मिळाला आहे.
अंबानगरीला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबा-एकविरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. राज्यभरातील भाविकभक्त अंबा-एकविरेच्या दर्शनासाठी येतात. परजिल्ह्यातील भाविकांसाठी अन्नछत्राची व्यवस्था करण्यातयेते. नवरात्रोत्सवातील महाप्रसाद पत्रिका वाटून केले जात होते. त्यामुळे अनेक भाविक महाप्रसादापासून वंचित राहत होते. गोरगरिब नागरिक मोठ्या आशेने महाप्रसादासाठी मंदिरात येत होते. मात्र, पत्रिका नसल्यामुळे त्यांना महाप्रसाद मिळत नव्हता. देव सर्वांसाठीच आहे, मग महाप्रसादात भेदभाव कशाला, असा प्रश्न भाविकांना पडला होता. लोकभावना जाणून 'लोकमत'ने अंबा-एकविरा देवी संस्थाच्या पत्रिका वाटप कार्यक्रम लोकदरबारी मांडून हा मुद्दा रेटून धरला होता. अखेर संस्थान पदाधिकाऱ्यांनी सामजंस्याची भुमिका घेत महाप्रसाद खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदाचा महाप्रसाद खुला करण्यात आला . मंदिरात येणाºया प्रत्येक भाविकांना आता महाप्रसादाचा लाभ होत आहे. एकविरा देवी संस्थानच्या महाप्रसादाचा नऊ ते दहा हजार भाविकांनी लाभ घेतला असून, या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अंबा एकविरा अमरावतीकरांचे नव्हेतर राज्याच्या कानाकोपºयातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे.
पत्रिका वाटून महाप्रसादाला बोलाविण्याची पध्दत आता बंद करण्यात आली आहे. महाप्रसाद सर्वांसाठी खुला करण्यात आला असून, आतापर्यंत नऊ ते दहा हजार भाविकांनी लाभ घेतला आहे.
- रमेश गोडबोले, अध्यक्ष, एकविरा देवी संस्थान